लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिºयाचे माणसाला कायम आकर्षण असते. हिरा हा सौंदर्याचा, कलात्मकतेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे. आधीच मोहक असलेल्या हिºयाला पैलू पाडून कलात्मक दागिने तयार केले तर कुणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही. लखलखत्या दागिन्यांची अनोखी झळाळी आणि नावीन्यपूर्ण असा हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आहे. स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणाºया जडजवाहिरांचे ‘इंट्रिया’ हे प्रदर्शन शनिवारपासून लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू झाले. सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारे दागिने ही ‘इंट्रिया’ची खास ओळख. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ यांच्या कल्पना-कौशल्यातून आविष्कृत झालेल्या दागिन्यांचे हे प्रदर्शन आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.अत्यंत आगळेवेगळे असे हिºयांचे सृजनात्मक कलात्मकतेचे दागिने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यातील डिझाईन्स व अनोखे रचनाकौशल्य मनाला भावल्याखेरीज राहात नाही. अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.याप्रसंगी प्रत्येक दागिन्याच्या डिझाईन्सवर आणि त्याच्या कलाकुसरीवर हिºयांच्या दागिन्यांवर प्रेम करणारे रसिक लुब्ध झाले. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात दिवाळी, भाऊबीज आणि सणासुदीच्या मुहूर्तावर उत्कृष्ट कलात्मकतेसह संस्कृती आणि परंपरांचा अनोखा मेळ साधणारे डिझाईन्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.बहुसंख्य दागिने व्हाईट, येलो आणि पिंक गोल्डमध्येइंट्रियाच्या संचालक आणि सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा कोठारी या नुकत्याच ‘हाँगकाँग जेम्स अॅण्ड ज्वेलरी’ या प्रदर्शनात भाग घेऊन आल्या आहेत. या प्रदर्शनातील दागिन्यांची विशेषता सांगताना डिझायनर पूर्वा कोठारी म्हणाल्या, इंट्रियाचा प्रत्येक दागिना हा ‘स्टायलिश’ आणि ‘डिफरंट’ असावा याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. अगदी पारंपरिक दागिन्यांपासून ते इंडो-वेस्टर्न, पार्टी वेअर अशा स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत. प्रदर्शनात बहुसंख्य दागिने व्हाईट गोल्ड, येलो गोल्ड आणि पिंक गोल्डने तयार केले आहेत. यात इअररिंग्ज, रिंग्ज, कंठहार, कफलिंग्ज आणि ब्रायडल सेट्स यांचा समावेश आहे. यासोबतच बर्मीस, रेड रुबीज् (माणिक) आणि ग्रीन इमरलँडस् (पन्ना) जोडून अत्यंत भव्य रूप देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. जास्तीतजास्त वेळ कम्फर्टेबली हिºयांचे कलात्मक दागिने घालता यावे म्हणून यंदा खास ‘लाईट वेट’ दागिन्यांची शृंखला आम्ही सादर केली आहे. दागिन्यांच्या फिनिशिंगमध्ये अद्ययावतता आणि आधुनिकता आणण्यासाठी विदेशातील तज्ज्ञ कारागिरांची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे ‘इंट्रिया’चे हिºयांचे दागिने केवळ लग्न समारंभच नव्हे तर प्रत्येक प्रसंगात सहजपणे घालता येतील असे आहेत. सोबतच, दिवाळी, भाऊबीज, नवीन वर्ष, वाढदिवस आदी निमित्ताने कुणाला भेट म्हणूनही देता येतील, असे दागिन्यांचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, या प्रदर्शनामध्ये हिºयांच्या गुणवत्तेकडे, डिझाईन्सकडे, रचनाकौशल्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. विशषे म्हणजे, परवडण्याजोग्या किमतीत हे दागिने आहेत.करवा चौथनिमित्त अर्धांगिनीला भेटवस्तू देण्याची संधीहिरेजडित दागिन्यांमुळे एकूण व्यक्तिमत्त्वाला एक निराळाच साज चाढतो. यामुळे जे लोक आपल्या अर्धांगिनीला आज करवा चौथनिमित्त भेटवस्तू देण्याचे विचार करीत असतील तर त्यांच्यासाठी ‘इंट्रिया’ प्रदर्शन एक सुवर्णसंधी आहे. यासोबतच दिवाळी, भाऊबीजच्या पर्वावर आपल्या प्रिय व्यक्तीला हे दागिने भेट म्हणूनही देता येतील.विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रशंसाइंट्रिया प्रदर्शनात यंदा हिºयांच्या दागिन्यांची कुठली शृंखला सादर करण्यात येणार याबाबत बरेच कुतूहल होते. यामुळे पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज दिवसभर प्रदर्शनाला भेट देणाºया हिरे प्रेमींनी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी फुलली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनाची प्रशंसा केली.प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवसदिवाळी आणि सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आयोजित हे प्रदर्शन सीमित कालावधीसाठी आहे. हे प्रदर्शन ८ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजतापर्यंत नागपूरकरांसाठी सुरू राहणार आहे.
स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणारे ‘इंट्रिया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:51 IST
हिºयाचे माणसाला कायम आकर्षण असते. हिरा हा सौंदर्याचा, कलात्मकतेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे. आधीच मोहक असलेल्या हिºयाला पैलू पाडून कलात्मक दागिने तयार केले तर कुणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही.
स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणारे ‘इंट्रिया’
ठळक मुद्देथाटात उद्घाटन : पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम प्रदर्शनाला अनेक मान्यवरांची भेट