शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

सिंचन घोटाळ्यातील आरोपींना अंतरिम दिलासा

By admin | Updated: April 13, 2016 03:23 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी सिंचन घोटाळ्यातील आरोपींना अंतरिम दिलासा देऊन पुढील तारखेपर्यंत

हायकोर्ट : आर.जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शनचे संचालक आरोपीनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी सिंचन घोटाळ्यातील आरोपींना अंतरिम दिलासा देऊन पुढील तारखेपर्यंत त्यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असा आदेश दिला. तसेच, सदरचे पोलीस निरीक्षक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आरोपींमध्ये आर.जे. शाह अ‍ॅन्ड कंपनी मुंबईच्या संचालिका कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, त्यांचे भागीदार डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जिगर प्रवीण ठक्कर व अरुणकुमार गुप्ता यांचा समावेश आहे. मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्यात या सहा आरोपींचा समावेश आहे.आरोपींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाचे टेंडर भरले होते. टेंडर मंजूर झाले होते. परंतु शासनाने भूसंपादन केले नसल्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही. या कामासाठी शासनाकडून त्यांनी एक पैसाही घेतला नाही. या प्रकरणाच्या चौकशीकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पूर्ण सहकार्य केले. आवश्यक ती कागदपत्रे दिली. परंतु, विभागाने घोटाळ्यासंदर्भातील जनहित याचिकेच्या दबावाखाली येऊन एफआयआर नोंदविला. हा एफआयआर रद्द करण्यात यावा अशी आरोपींची विनंती आहे. यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज सादर केला आहे. आरोपींतर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर, अ‍ॅड. आनंद परचुरे व अ‍ॅड. प्रकाश धारस्कर तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)