आरोपींमध्ये अजय वासुदेव गुळाले (२४), वासुदेव दसरू गुळाले (४७), कांता वासुदेव गुळाले (४२), कांचन वासुदेव गुळाले (२०), संकेत धीरज कमाले (२५), करिश्मा रोशन ढोपरे (२९), प्रवीण रवींद्र टिकले (२५), प्रमोद श्याम गाखरे (२४), शैलेश रवींद्र मंगल (२२) व अनिता जगदीश गाखरे (३४) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध जलालखेडा पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तक्रारकर्ती महिला विवाहित आहे. आरोपी अजयने तिचे अपहरण केले तसेच तिच्यावर बलात्कार केला. इतर आरोपींनी यासाठी अजयला मदत केली, अशी पोलीस तक्रार आहे. आरोपींच्या वतीने ॲड. भूषण डफळे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधून आरोपींना या प्रकरणात फसविण्यात आल्याचा दावा केला. त्यात प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्यामुळे आरोपींना अंतरिम दिलासा मिळाला.
दहा आरोपींना अंतरिम जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST