शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महिलांकडे आज इंटरसिटी, विदर्भ एक्स्प्रेसचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 21:18 IST

जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरातून सुटणाऱ्या  दोन रेल्वेगाड्या गुरुवारी महिला कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे.

ठळक मुद्देजागतिक महिला दिन : अजनी, इतवारी रेल्वेस्थानकाचे करणार संचालन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरातून सुटणाऱ्या  दोन रेल्वेगाड्या गुरुवारी महिला कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे.नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेसला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता ८ मार्चला सकाळी ७.२० वाजता हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील तर मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला नागपूर ते गोंदियापर्यंत महिला कर्मचारी चालविणार आहेत. यात दोन्ही रेल्वेगाड्यांचे लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट, गार्ड, तिकीट तपासणी आणि रेल्वे सुरक्षा दल या सर्व महिला राहणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त या उपक्रमाव्यतिरिक्त स्थायी रुपाने अजनी रेल्वेस्थानकाचे संचालन महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. माटुंगा आणि जयपूरच्या गांधीनगर स्टेशननंतर देशातील हे तिसरे रेल्वेस्थानक राहणार आहे, जेथे सर्व महिला काम पाहतील. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार इतवारी रेल्वेस्थानकावर ८ मार्चला सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान सर्व कामे महिला कर्मचारी करतील. यात सफाईच्या कामाचाही समावेश आहे. हे काम एका दिवसासाठी महिला सांभाळणार आहेत. गोंदिया रेल्वेस्थानकावरही सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशीनचे लोकार्पण महिला समाज सेवा समितीच्या अध्यक्ष विधी अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे.

 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर