शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत पूर्ण होणार इंटरचेंज स्टेशन

By admin | Updated: March 18, 2017 03:05 IST

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सीताबर्डी येथील मुंजे चौकात इंटरचेंज मेट्रो स्टेशनच्या (आयकॉनिक टॉवर) बांधकामासाठी

मुंजे चौक : रस्त्यापासून दोन मीटर जागा सोडून बॅरिकेडस् लावणार नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सीताबर्डी येथील मुंजे चौकात इंटरचेंज मेट्रो स्टेशनच्या (आयकॉनिक टॉवर) बांधकामासाठी एका बाजूचा रस्ता बंद करून बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मुंजे चौकापासून आनंद टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर दोन मीटर जागा सोडून नव्याने बॅरिकेडस् लावण्यात येणार आहे. हे काम १० दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) प्रकल्प संचालक महेश कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.(प्रतिनिधी) दहा महिन्यानंतर हटणार बॅरिकेडस् विस्तृत जागेसाठी व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरील फूटपाथ हटविण्यात येईल. एक महिन्यानंतर आनंद टॉकीजकडून मुंजे चौकाकडे जाणारा मार्ग बॅरिकेडस्ने बंद करण्यात येईल. या मार्गावरही दोन मीटर रस्ता सोडण्यात येईल. मेट्रोच्या बांधकामासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महेश कुमार यांनी केले. याशिवाय सीताबर्डी मुख्य मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासह येथे माहिती आणि मदत केंद्र स्थापन करण्यात येईल. टोल फ्री क्रमांकावरून लोकांना तक्रारीची नोंद करता येईल. मुंजे चौकातील बॅरिकेडस् १० महिन्यानंतर हटविण्यात येणार आहे, तर इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण होईल. प्रजापतीनगर येथे लवकरच बांधकाम मेट्रो रेल्वेचा टप्पा-४ ची निविदा नुकतीच काढण्यात आली आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये प्रजापतीनगर येथे मेट्रोचे बांधकाम सुरू होणार आहे. पुढील आठवड्यात कंत्राटदाराला कामाचे पत्र देण्यात येणार आहे. पत्रपरिषदेत महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क व समन्वय) शिरीष आपटे, महाव्यवस्थापक (वाहतूक) अरविंद गिरी, अशोक कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. चौथ्या माळ्यावरून मेट्रोच्या वाहतुकीवर लक्ष महेश कुमार म्हणाले, इंटरचेंज मेट्रो स्टेशन (आयकॉनिक टॉवर) ‘एल’ आकाराचे राहील. पहिल्या माळ्यावर (कॉन्कोर्स) मेट्रोचे तिकीट मिळेल. दुसऱ्या माळ्यावर पूर्व-पश्चिम तर तिसऱ्या माळ्यावर उत्तर-दक्षिण कॉरिडोरसाठी प्लॅटफॉर्म आणि चौथ्या माळ्यावर नियंत्रण केंद्र (ओसीसी) कार्यरत राहील. येथून दोन्ही कॉरिडोरच्या मेट्रो रेल्वेचे परिचालन, सिग्नल, वीज, एस्केलेटर, सीसीटीव्ही आदी बारीकसारीक तांत्रिक पैलूंवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत १५५० कोटींचा खर्च महामेट्रोचे संचालक (वित्त) एस. शिवमाथन यांनी सांगितले की, ८६८० कोटींच्या या प्रकल्पात आतापर्यंत १५५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. यात मनपा आणि नासुप्रकडून हस्तांतरित जमिनीच्या किमतीचा समावेश आहे. गेल्यावर्षी ११०० कोटी रुपये खर्च झाले होते. तर वर्ष २०१७-१८ मध्ये २७०० कोटींची आवश्यकता राहील. मनपाकडून ४५० आणि नासुप्रकडून ४५० कोटी रुपये घेणे आहे. झिरो माईल्सवर २० मजली इमारत झिरो माईल्स येथील मेट्रोची इमारत २० माळ्यांची राहील. तसे डिझाईन तयार केले आहे. मंजुरी पाच माळ्याची मिळाली आहे, ही बाब खरी आहे. पण पाच माळ्यानंतरचे डिझाईन स्टीलचे राहील. पाचव्या माळ्यावर प्लॅटफॉर्म राहील. १५ माळे पीपीपी मॉडेलनुसार बनविण्यात येणार आहे. या स्टेशनचे काम सुरू असल्याचे महेश कुमार म्हणाले. इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे कंत्राट आयएल अ‍ॅण्ड एफएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, हैदराबाद आणि हिंगणा येथील स्टेशन बांधकामाचे कंत्राट आयटीडी कंपनीला दिले आहे. फ्रान्सची इनिया कंपनी दोन्ही कामांचे आर्किटेक्ट आहेत.