शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

‘रिपब्लिकन फ्रंट’खाली एकवटले गट

By admin | Updated: January 13, 2017 02:03 IST

काँग्रेसच्या पाठबळावर विधान परिषदेत जाणारे पीपीप्लस रिपब्लिकन पार्टीचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे

जोगेंद्र कवाडे यांची घोषणा : मनपात ७५ जागा लढविणार नागपूर : काँग्रेसच्या पाठबळावर विधान परिषदेत जाणारे पीपीप्लस रिपब्लिकन पार्टीचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रिपब्लिकन गटांनी एकत्र करीत ‘रिपब्लिकन फ्रंट’ स्थापन केला आहे. या फ्रंटच्या माध्यमातून महापालिलका निवडणुकीत ७५ जागा लढविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. तशी घोषणा त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.सर्व आंबेडकरी राजकीय कक्षांची मोट बांधल्यामुळे नवे राजकीय समीकरण उदयास येते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आंबेडकरी पक्षांचा हा फ्रंट काँग्रेसला समर्थन देणार की वेगळे अस्तित्व दाखविणार, असाही प्रश्न या निमित्त उपस्थित झाला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यासाठी तर हा फ्रंट तयार करण्यात आला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एरव्हीच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडे वळणारी व त्यामुळे विखुरणारी आंबेडकरी मते या फ्रंटच्या निमित्ताने एकत्रित आली असली तरी आपले राजकीय अस्तित्व ते कसे निर्माण करतील व बहुजन समाज पक्षासमोर कसे आव्हान निर्माण करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविभवन येथे गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत कवाडे म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने विविध रिपब्लिकन गट एकत्र आले आहेत. रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी संघटनांना आणखी सोबत जोडण्यात येणार आहे. ज्यांना या फ्रंटमध्ये यायचे आहे, त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. इतर पक्ष किंवा आघाड्यांशी सुद्धा चर्चा केली जाईल. निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. अनुसूचित जाती, जमाती यांच्यासह ओबीसी, अल्पसंख्याक, मुस्लीम आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सुद्धा संधी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात ज्या पद्धतीने विविध रिपब्लिकन गटांनी एकत्र येऊन रिपब्लिकन फ्रंट तयार केला आहे, त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यात जिथे-जिथे निवडणुका होऊ घातल्या आहेत. तिथे याच प्रकारचा फ्रंट तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही कवाडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला ज्येष्ठ नेते अमृत गजभिये, हरिदास टेंभुर्णे, इ.मो. नारनवरे, प्रकाश कुंभे उपस्थित होते.(प्रतिनिधी) असा आहे ‘फ्रंट’सध्या फ्रंटमध्ये रिपाइं (गवई), रिप (खोरिपा), रिपब्लिकन सेना, रिपाइं एकतावादी, रिप (खोब्रागडे), रिप (खोरिप), ऐक्यवादी रिपाइं, समता सैनिक दल, रिपब्लिकन ऐक्य परिषद, रिपब्लिकन आंदोलन, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपाइं (राजाभाऊ खोब्रागडे) आदी १२ पक्ष व संघटना.प्रकाश आंबेडकरांना एकीकरणाची अ‍ॅलर्जी का? रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा प्रयत्न जेव्हा-जेव्हा होतो तेव्हा-तेव्हा भारिप बहुजन महसंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रिपाइंच्या एकीकरणाची अ‍ॅलर्जी का, असा प्रश्न प्रा. कवाडे यांनी उपस्थित केला. रिपब्लिकन फ्रंट संदर्भात आपण उपेंद्र शेंडे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच काँग्रेस-भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा सोबत यावे, त्यांचे स्वागतच आहे, असे आवाहनही त्यांनी केले. २५ पासून उमेदवारांच्या मुलाखतीयेत्या २० जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांनी ‘रिपब्लिकन फ्रंट’च्या कार्यालयात अर्ज सादर करावेत. २५ तारखेपासून मुलाखती घेण्यात येतील. २७ जानेवारीला उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यासोबतच फ्रंटचा वचननामा सुद्धा प्रसिद्ध केला जाईल. शैक्षणिक पात्रता, प्रभागातील कार्य, चळवळीला दिलेले योगदान, आर्थिक क्षमता आणि ‘रिपब्लिकन फ्रंट’ प्रति त्याची निष्ठा हे निकष उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आले आहेत.