शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

२२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्याचे ‘यूजीसी’चे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:20 IST

२२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालये गणिताचा सन्मान करणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये अनेकदा प्रशासनाने निर्देश दिल्यानंतर अनिवार्य उपक्रम किंवा कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत उदासीनता दाखविण्यात येते. २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहे. गणिताचे महत्त्व लक्षात घेता महाविद्यालये विद्यार्थी हित लक्षात घेता यासंदर्भात पुढाकार घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.२२ डिसेंबर १८८७ साली तामिळनाडूतील इरोड येथे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता. रामानुजन यांनी ‘मॅथेमॅटिकल अ‍ॅनालिसिस’, ‘नंबर थिअरी’, ‘इन्फायनाईट सिरीज’ आणि ‘कन्टिन्युईड फ्रॅक्शन्स’ या मुद्यांवर मौलिक योगदान दिले होते. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी २२ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित करण्यात आला. या दिवशी सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालये यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. गणिताबाबत आवड, जागृती निर्माण करण्यासाठी तसेच ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट, रामानुजन यांच्या कर्तृत्वाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी ‘सेमिनार’, व्याख्यान यांचे आयोजन करावे, यासाठी देशातील विविध शिक्षणतज्ज्ञ, संशोधक यांना बोलविण्यात यावे, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आली आहे. सोबतच प्रश्नमंजुषा, ‘पोस्टर प्रेझेंटेशन’सारख्या स्पर्धांचेदेखील आयोजन करता येईल. यासाठी भारतीय गणित, आयुष्याचे गणित किंवा गणिताचे प्रत्यक्ष ‘अप्लिकेशन्स’ यासारख्या ‘थीम्स’ ठेवाव्यात, असेदेखील विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सांगण्यात आले आहे. साधारणत: विद्यापीठ अनुदान आयोग किंवा नागपूर विद्यापीठ यांच्या निर्देशांचे महाविद्यालयांनी पालन करावे, असे अपेक्षित असते. मात्र निर्देशांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करणारी यंत्रणाच विद्यापीठात नाही. त्यामुळे सर्रासपणे बहुतांश महाविद्यालयांकडून निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. अशा स्थितीत राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम महाविद्यालयांत साजरा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यापीठाकडून अद्याप निर्देश नाहीतआश्चर्याची बाब म्हणजे नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर गणित विभाग तसेच विविध संलग्नित महाविद्यालयांत गणित शिकणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. याशिवाय अभियांत्रिकीमध्येदेखील गणित शिकविण्यात येते. असे असतानादेखील विद्यापीठाने कुठलेही दिशानिर्देश जारी केलेले नाहीत.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ