शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अग्निऐवजी झाडाला साक्षी मानत झाली त्यांची सप्तपदी

By admin | Updated: June 26, 2017 17:56 IST

वर्धेत एका नवदाम्पत्याने अग्निऐवजी झाडाला साक्षी मानून सप्तपदी केली.

रूपेश खैरी। वर्धा : विवाह बंधनात सप्तपदीला विशेष महत्त्व दिले जाते. ही सप्तपदी कायम राखत वर्धेत एका नवदाम्पत्याने अग्निऐवजी झाडाला साक्षी मानून सप्तपदी केली. वृक्षतोड करून आग प्रज्वलित करण्याऐवजी या दाम्पत्याने एका रोपट्याची पूजा केली. सप्तपदीनंतर वर्धेतील हनुमान टेकडी गाठत या रोपट्याचे रोपण करून निसर्गसंवर्धनाचा संदेश देत आपल्या संसाराची मुहर्तमेढ रोवली. वर्धा येथील भास्कर कोहळे यांची कन्या निकिता आणि पनवेल येथील दिनकर इंगोले यांचे चिरंजीव भूषण या दोघांचा रविवारी वर्धेत विवाह झाला. त्यांचा विवाह निसर्गसंवर्धनाची साक्ष देणारा ठरला. भूषण यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून ते मुंबई येथे फिल्म एडीटींगचे काम करतात तर वधू निकिता ही येथील सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दोघेही उच्च शिक्षित असल्याने त्यांनी दिवसेंदिवस समाजात विवाह समारंभात होत असलेल्या कर्मकांडांना फाटा देण्याचा निर्णय घेत सप्तपदीऐवजी वृक्षपदी करण्याचा निर्णय घेतला. विवाह मंडपात इतर सोपस्कार पार पाडल्यानंतर कुटुंबियांच्यावतीने सप्तपदीचा विधी सुरू झाला. यावेळी होम पेटविण्याऐवजी त्यांनी एका रोपट्याची पूजा करून विधी सुरू केला. या हिरव्या रोपट्याला सप्तपदीच्या सात प्रदक्षिणा मारून विधी आटोपल्यानंतर या रोपट्याचे रोपण करण्याचे ठरले. या वृक्षारोपणाकरिता या दाम्पत्याने त्यांच्या परिवारासह हनुमान टेकडी गाठली. येथे वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने वृक्षारोपणाकरिता तयार केलेल्या खड्ड्यात रोपटे लावण्यात आले. यावेळी वधू व वर पक्षातील नागरिकांसह अनेकांची उपस्थिती होती.