शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

बाबांच्या कष्टाने दिली अभ्यासाची प्रेरणा

By admin | Updated: June 18, 2014 01:32 IST

उन्हातान्हात बाबा राबराब राबतात. मातीगोट्याचे काम करताना त्यांचे अख्ख शरीर काळकुट्ट होतं. त्यांच्या शरीराचा घामच मला अभ्यासाची प्रेरणा द्यायचा़ आपसूकच हात पुस्तकाकडे जायचे.

शफी पठाण - नागपूरउन्हातान्हात बाबा राबराब राबतात. मातीगोट्याचे काम करताना त्यांचे अख्ख शरीर काळकुट्ट होतं. त्यांच्या शरीराचा घामच मला अभ्यासाची प्रेरणा द्यायचा़ आपसूकच हात पुस्तकाकडे जायचे. माझ्या शिक्षणाला पैसा खूप लागत असल्याने घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती़ अभ्यास सोडून आपणही बाबांना मदत करावी, असे वाटायचे पण या कामाला हात नको लावूस अभ्यास कर अन् मोठी हो... ही आईची साद मला पुन्हा अभ्यासाकडे वळायला प्रवृत्त करायची़ त्यामुळेच मी आज हे यश मिळवू शकले़ उंटखाना येथे १० बाय १०च्या भाड्याच्या खोलीत राहून ७५.४० टक्के गुण मिळवणारी वंशिका कैलाश गणवीर सांगत होती, तिच्या संघर्षाची गाथा़ महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलची वंशिका विद्यार्थिनी आहे. वंशिका म्हणाली, आईवडिल दहावी-नापास आहेत. परंतु माझ्यासाठी घेत असलेले त्यांचे कष्ट पाहून त्यामानाने आपण काहीच करीत नसल्याची खंत मनात राहायची़ मेहनत घेण्याची तयारी होती़ पण मार्ग कोणी दाखवत नव्हता़ असा अभ्यास कर, हे वाच असेही सांगणारेही कुणीच नव्हते़ यामुळे जमेल तसा अभ्यास केला़ सकाळी सायकलवर मजुरीवर जाणाऱ्या बाबाला पाहताना मन कासावीस व्हायचे़ ज्या दिवशी नोकरी लागेल त्या दिवशी बाबांची हातमजुरी बंद करेल, ही गाठ मनाशी बांधलेली आहे. ती बोलता बोलता थांबते.डोळ्यातील अश्रू पुसते. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहत आईवडिल दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळतात. पोरीनं शिकावं एवढंच ते म्हणतात. वंशिका म्हणाली, माझा गणित हा विषय कच्चा होता. बाबांना सांगितले, त्यांनी लागलीच त्यांच्या ठेकेदाराकडून उसने पैसे घेतले. क्लासेस लावले. परंतु येथील सर इंग्रजीतून शिकवित होते, त्यामुळे नीट समजत नव्हते. परंतु घरी येऊन सरावातून स्वत:च समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. प्रकृती साथ देत नव्हती. हृदयविकाराचा त्रास व्हायचा. परीक्षेच्या पहिल्या १५ दिवसांपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये होते. मला ९० टक्केच्यावर गुण घ्यायचे होते, पण...आता बारावीत नक्कीच घेईल. त्याची तयारी आतापासून करेन, असे म्हणत वंशिका उठते हातावर साखर ठेवते. वंशिकाला डॉक्टर-इंजिनियर व्हायचे नाही. तिला खंड विकास अधिकारी (बीडीओ) व्हायचे आहे.