शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

बिहार बाबासाहेबांची प्रेरणाभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 03:56 IST

राज्यपाल रामनाथ कोविंद म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणतज्ज्ञ, विधितज्ज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते

राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन नागपूर :राज्यपाल रामनाथ कोविंद म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणतज्ज्ञ, विधितज्ज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते अशा विविध सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारताना राष्ट्रहित सर्वाेच्च मानले. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. बाबासाहेबांची कर्मभूमी महाराष्ट्र असली तरी प्रेरणाभूमी ही बिहार आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रेरणेने सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढ्याला सुरुवात केली. अध्यक्षीय भाषणात भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर प्रवीण दटके यांनी आपले विचार मांडले. यावेळी स्मारक समितीचे सदस्य अ‍ॅड. मा.मा. येवले, अ‍ॅड. आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. सुधीर फुलझेले, डी.जी. दाभाडे, विलास गजघाटे व्यासपीठावर होते. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले तर आभार विजय चिकाटे यांनी मानले. या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते साप्ताहिक रिपब्लिकन संदेशचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पंडित सूरमणी प्रभाकर धाकडे यांच्या बुद्ध-भीम गीताने झाली. समारोप राष्ट्रगीताने झाला. (प्रतिनिधी)तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल - रामदास आठवले यावेळी रामदास आठवले म्हणाले, कोणी कितीही मोठे मोर्चे काढले तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद रद्द होणार नाही. अ‍ॅट्रॉसिटी ह अन्याय करणारा कायदा नसून रक्षण करणारा कायदा आहे. हा कायदा रद्द करण्याची वेळ आलीच तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे यावेळी त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांना, बुद्धाला आणि संविधानाला मानतात. त्यामुळे संविधान कधीच बदलणार नाही. संविधान बललले तर देश बदलेल. दीक्षाभूमीची जागा आता कमी पडू लागली आहे. तेव्हा स्मारक समितीला हवी तितकी जागा सरकारने द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना त्यांनी केली. तसेच सध्या मी केंद्रात तीन वर्ष मंत्री आहे, त्यामुळे स्मारक समितीला जे काही हवे असेल ते त्यांनी मागावे मी देईल, असेही सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत काही कविताही सादर केल्या.