शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हॉटस्पॉट भागातील पाच हजार लोकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

कोविड नियंत्रणासाठी मनपा सतर्क : रविवारी ३५० लोकांची तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या ...

कोविड नियंत्रणासाठी मनपा सतर्क : रविवारी ३५० लोकांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या वाढत असल्याने मनपाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मनपा आयुक्तांनी घोषणा केलेल्या नवीन ९ हॉटस्पॉट भागातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. रविवारी ३५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. या भागातील पाच हजार नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. संशयितांची कोरोना चाचणी करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरणात पाठविले जात आहे.

संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्क्रीनिंग सुरू केली आहे. पहिल्या दिवशी २५० लोकांची, तर दुसऱ्या दिवशी रविवारी ३५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. ३५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचा रिपोर्ट सोमवारी मिळणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांनी खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बिडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगरात अधिक संक्रमित आढळल्यामुळे या भागांना हॉटस्पॉटच्या श्रेणीत टाकले आहे. या भागात ट्रेसिंग व कोविड तपासणीची प्रक्रिया या भागात वाढविण्यात आली आहे. संक्रमितांचे घर व आजूबाजूच्या शेजाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. संक्रमण टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

....

झोन स्तरावर ७२ पथक गठित

हॉटस्पॉट भागातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी ७२ पथक गठित करण्यात आले आहेत. यात १४४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका पथकाकडून दररोज ५० घरांतील सदस्यांची आरोग्य विभागाच्या पथकामार्फत संशयितांची तपासणी व स्क्रिनिंग केली जात आहे. तपासणीत लक्षणे आढळून आल्यास आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे.

...

पथकांची संख्या वाढविणार

सध्या ७२ पथकामार्फत तपासणी व स्क्रिनिंग केली जात आहे. या कामाला गती देण्यासाठी सोमवारपासून पथकांची संख्या वाढविली जाणार आहे. यात मनपातील अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश राहील. हे कर्मचारी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कामासाठी मदत करतील.