शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध पूर्व परवानगीशिवाय तपास अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:27 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याविरुद्ध शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय तपासाचा आदेश जारी करता येत नाही असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णयजेएमएफसी न्यायालयाचा आदेश रद्द

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याविरुद्ध शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय तपासाचा आदेश जारी करता येत नाही असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.भंडारा येथील तत्कालीन सिटी सर्वे अधिकारी महेश टिके यांना चुकीच्या आदेशाचा फटका बसला होता. गोपिचंद कोरे यांनी जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल करून टिके यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला होता. ३ जुलै २०१७ रोजी जेएमएफसी न्यायालयाने तक्रारीची दखल घेऊन प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश सीआरपीसीमधील कलम १५६ (३) अंतर्गत दिला होता. त्यामुळे टिके यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन हा आदेश अवैध असल्याचा दावा केला होता. उच्च न्यायालयाने हा दावा विविध बाबी लक्षात घेता मान्य केला.३० आॅगस्ट २०१६ रोजी सीआरपीसीमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्या दुरुस्तीनुसार, सीआरपीसीमधील कलम १५६ (३) अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याविरुद्ध तपासाचा आदेश देण्यापूर्वी कलम १९७ अंतर्गत शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. जेएमएफसी न्यायालयाने वादग्रस्त आदेश जारी करताना ही दुरुस्ती लक्षात घेतली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश रद्द करून जेएमएफसी न्यायालयाला कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले. टिके यांच्या वतीने अ‍ॅड. मसुद शरीफ व अ‍ॅड. आदिल मिर्झा यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :Courtन्यायालय