शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात माहिती आयोगाची गती मंदावली; तीन महिन्यांपासून एकही तक्रार निकाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 10:14 IST

Nagpur News मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागल्यानंतर राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या कामाची गती मंदावली आहे.

ठळक मुद्देमार्च २०२० च्या तुलनेत नागपूर खंडपीठातील प्रलंबित अपिलांची संख्या ६१ टक्क्यांनी वाढली

 

योगेश पांडे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा राज्य माहिती आयोगाच्या कार्यप्रणालीलादेखील फटका बसला आहे. मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागल्यानंतर आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या कामाची गती मंदावली आहे. तेव्हाच्या तुलनेत प्रलंबित द्वितीय अपिलांच्या संख्येत ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या वर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांत एकही तक्रार निकाली काढण्यात आलेली नाही. अशा स्थितीत माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मार्च २०२० मध्ये २ हजार २६१ द्वितीय अपिले प्रलंबित होती. लॉकडाऊन लागल्यानंतर आयोगाचे काम ऑनलाईन माध्यमातून चालले. कोरोनाचा काळ असला तरी दर महिन्यात दाखल होणाऱ्या द्वितीय अपिलांची संख्या सरासरी दोनशेहून अधिक होती. मात्र त्या तुलनेत अपिलांना निकाली काढण्याचे प्रमाण कमी होते. डिसेंबर २०२० च्या अखेरीस प्रलंबित प्रकरणांची संख्या २ हजार ८०२ इतकी होती. तर मे २०२१ महिन्यात हाच आकडा साडेतीन हजारांच्या पार गेला. मे महिन्यात २२९ द्वितीय अपिले दाखल झाली व ३१ अपिले निकाली काढण्यात आली. महिन्याअखेर ३ हजार ६४६ अपिले प्रलंबित होती.

तक्रारी निकाली काढणेच थांबले

मार्च २०२० मध्ये नागपूर खंडपीठाकडे ७५५ तक्रारी प्रलंबित होत्या. एप्रिल २० ते जून २० या कालावधीत एकही तक्रार निकाली निघाली नाही. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या कालावधीतदेखील एकही तक्रार निकाली काढण्यात आली नाही. डिसेंबर २०२० मध्ये २५ नवीन तक्रारी दाखल झाल्या व एकूण ८७५ तक्रारी प्रलंबित होत्या. या वर्षी मार्च ते मे २०२० या कालावधीतदेखील एकही तक्रार निकाली निघाली नाही. मे महिन्याच्या अखेरीस ९५९ तक्रारी प्रलंबित होत्या.

संथ काम पण इतरांच्या तुलनेत बरा कारभार

नागपूर खंडपीठातील काम संथ असले तरी इतर खंडपीठांच्या तुलनेत बरा कारभार असल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. मे महिन्याच्या अखेरीस नागपूर खंडपीठात सर्वात कमी द्वितीय अपिले प्रलंबित होती. तर प्रलंबित तक्रारींत आठ खंडपीठांमध्ये नागपूर खंडपीठाचा पाचवा क्रमांक होता.

 

 

टॅग्स :Governmentसरकार