शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर हजार पार..! पेट्रोल, डिझेलवरही महागाईचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 12:04 IST

मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी ५० रुपयांची वाढ केल्यानंतर दर १,००१ रुपयांवर पोहोचले आहेत. पुढे दरवाढीची आणखी शक्यता आहे. गरीब आणि सामान्यांना सिलिंडर खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागेल.

ठळक मुद्देगरीब, सामान्यांना सर्वाधिक फटकासबसिडी केवळ ४०.१० रुपये

नागपूर : तब्बल १७१ दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर आणि १४१ दिवसांनंतर पेट्रोलडिझेलच्या किमती वाढविल्यानंतर मंगळवारी गरीब आणि सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब उसळला आहे. सिलिंडरची किंमत एक हजारापार गेली आहे. नवीन दर मंगळवारपासून लागू करण्यात आले असून, गृहिणींचे महिन्याचे बजेट वाढले आहे.

याआधी १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरचे दर ऑक्टोबर महिन्यात १५ रुपयांनी वाढून ९५१ रुपयांवर गेले होते. तेव्हापासून तब्बल १७१ दिवस हे दर स्थिर होते; पण मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी ५० रुपयांची वाढ केल्यानंतर दर १,००१ रुपयांवर पोहोचले आहेत. पुढे दरवाढीची आणखी शक्यता आहे. गरीब आणि सामान्यांना सिलिंडर खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागेल.

पेट्रोल ११०.५३ रुपये आणि डिझेल ९३.३५ रुपये प्रति लिटरवर गेले आहे. दोन्ही इंधनात प्रति लिटर ८० पैशांची वाढ झाली आहे. दरवाढीसाठी रशिया-युक्रेन युद्धाचे कारण सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची वाढलेली किंमत बघता आता पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढणार असून, आधीचा विक्रमदेखील मोडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या किमतीचाही भडका उडणार आहे.

गॅस सबसिडी केवळ ४०.१० रुपये

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची सबसिडी जून २०२० पासून ४०.१० रुपये स्थिर केली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये ६४४ रुपये दर होते, तेव्हाही ४०.१० रुपये सबसिडी होती आणि दर हजारापार गेल्यानंतरही तेवढीच सबसिडी मिळत आहे. सिलिंडरची खुल्या बाजारपेठेकडे वाटचाल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरवाढीमुळे महागाई भडकणार

केंद्र सरकारने सर्व पेट्रोलियम पदार्थ जीएसटीमध्ये आणण्याची गेल्या काही वर्षांपासून मागणी आहे. इंधनाची मूळ किंमत कमी तर त्यावर कर जास्त आहे. हा कर सर्वांनाच भरावा लागतो. यातून गरिबांना वगळावे. आजच्या दरवाढीमुळे महागाई आणखी भडकणार आहे.

गजानन पांडे, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत

दरवाढीतून गरिबांना वगळा

इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडणार आहे. आता सुरुवात असून, पुढे किमती आणखी वाढतील. त्याचा थेट परिणाम गरिबांच्या दैनंदिन जीवनावर होईल. केंद्र सरकारने दरवाढीतून गरिबांना वगळावे. दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

देवेंद्र तिवारी, राष्ट्रीय महासचिव, अ.भा. ग्राहक कल्याण परिषद

बस झाले, दरवाढ करू नका

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महिन्याचे बजेट बिघडले आहे. तुलनेत उत्पन्न कमी झाल्याने चिंता वाढली आहे. गॅस सिलिंडरची दरवाढ नकोच.

विद्या समर्थ, गृहिणी

सिलिंडर आवाक्याबाहेर

गॅस सिलिंडरची किंमत हजारापार आवाक्याबाहेर गेली आहे. सबसिडी काढून घेतली आहे. त्यामुळे त्याच दरात सिलिंडर खरेदी करावे लागते. सरकारने सिलिंडरचे दर ५०० रुपयांवर आणावेत.

ममता वैरागडे, गृहिणी

टॅग्स :InflationमहागाईCylinderगॅस सिलेंडरPetrolपेट्रोलDieselडिझेल