शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचे ‘फटाके’

By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचा फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या फटाक्यांच्या (फॅन्सी फटाके) मागणीत वाढ झाली आहे.

किमतीत १० टक्क्यांनी वाढ : चायना फटाक्यांची किंमत दुप्पटनागपूर : कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचा फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या फटाक्यांच्या (फॅन्सी फटाके) मागणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी विविध प्रकारात चायना फटाके आले आहेत. परंतु दिवाळीच्या तोंडावर अनेक ठोक विक्रेत्यांकडे फार कमी साठा राहिल्याने त्यांनी फटाक्याची किंमत दुप्पट केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीला आता काहीच दिवस राहिल्याने फटाक्यांच्या दुकानात बच्चेकंपनीबरोबर पालकांचीही गर्दी दिसू लागली आहे. सुमारे १९५० पासून भारतात चीनमधून फटाक्यांची आयात होत आहे. ‘चायना क्रॉकर्स’ फटाके त्या काळात आपल्याकडे प्रसिद्ध होते. आता हेच फटाके ‘पायली’च्या नावाने ओळखले जात आहेत. सध्या बाजारात १ इंचाच्या पायलीपासून ते ४ इंचच्या पायलीपर्यंत फटाके बाजारात उपलब्ध आहेत. आकाशात विविध रंगांची उधळण करणाऱ्या या फटाक्याची किंमत १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आहे. यासोबतच ‘सेव्हन शॉट ते ‘वन थाऊझंड शॉट’ फटाका उपलब्ध आहे. याची किंमत १५० रुपयांपासून ते १० हजार रुपयापर्यंत आहे. यात १२० शॉट असलेल्या ‘मस्का चस्का’ फटाक्याला दरवर्षी मोठी मागणी असते.चायना फटाक्यांमध्ये यावर्षी ‘गोल्डन येलो’ या फटाक्यात व्हिसलिंग करीत पिवळ्या रंगात अनार जळते. ‘स्काय एंगल टू इन वन’ यात जमिनीवर अनारसारखे वेगळ्या रंगात जळत असताना त्याच वेळी आकाशात दुसऱ्या रंगाची उधळण करते. ‘चायना बॉन्टी क्रकलिंग’ हा फटाका विविध आवाज करीत आकाशात झेपावतो. ‘बुलेट ट्रेन’ यात मध्यम आकाराची पायली असून एकाच वेळी बुलेट ट्रेनसारखा आवाज करीत १०० शॉट निघतात. ‘एरियल मल्टी एव्हनलाँच’ यात एकापाठोपाठ २४० शॉट आकाशात विविध रंगांची उधळण करतात. ‘मायाजाल’, ‘चटाचट ज्युरासिक पार्क’ व ‘गिल्टरिंग’ हे फटाके विविध आवाज करीत जमिनीवर फुटतात. हे सर्व फटाके ६० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. रॉकेटमध्ये ‘मिसाईल रॉकेट’ हे यावर्षी लाल आणि हिरव्या रंगात आले आहेत. (प्रतिनिधी)लवंगी, भूईचक्र, फुलझड्यांचेही चाहतेचायना व आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांच्या मागणीत वाढ झाली असली तरी लवंगी, भूईचक्र, अनार, टिकल्या व फुलझड्यांशिवाय दिवाळीचा आनंदच साजरा होत नसल्याने हे फटाकेही आवडीने फटाकाप्रेमी घेत असल्याचेही दिसून येत आहे. चायना फटाक्यांमध्ये पटक बॉम्ब (पॉपपॉप), पिंगपाँग बॉल, माचीस, पेन्सील, बंदूक आणि त्याच्या गोळ्यांना बच्चेकंपनीकडून मोठी मागणी असते. परंतु मागणीच्या तुलनेत साठा कमी असल्याने अनेक ठोक विक्रेत्यांनी त्याची किंमत दुप्पट केली आहे. कच्चा माल महागलाचांडक फटाका कंपनीचे मालक व नागपूर फायर वर्क्स डीलर असोसिएशनचे अशोक गुलाबचंद चांडक यांनी सांगितले, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामागील कारणे म्हणजे मजुरी, वाहतूक आणि कच्चा माल आदींच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ. यातच फटाक्यांमध्ये वापरत असलेले पोटॅशियम क्लोरेट हे मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशातून येते. यातही प्रचंड वाढ झाल्याने किमती वाढल्या आहेत.