शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्या वाढताना दलाल अन् असामाजिक तत्त्वांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 21:53 IST

रेल्वे बोर्डाच्या वतीने पूर्वी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. प्रवाशांची संख्या वाढली असताना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आणि असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दलाल आणि असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी चिंता : सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे बोर्डाच्या वतीने पूर्वी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. प्रवाशांची संख्या वाढली असताना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आणि असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दलाल आणि असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.रेल्वेगाड्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. पूर्वी रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली होती. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक काम असल्यामुळे प्रवासी प्रवास करीत आहेत. रेल्वेगाड्या वाढल्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. याचा फायदा रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल घेत आहेत. बनावट आयडी तयार करून ते प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे तिकीट उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन प्रवाशांची लूट सुरू आहे. मंगळवारीच रेल्वे सुरक्षा दलाने एका दलालाला अटक करून त्याच्याकडून रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत. अजूनही शहरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु असून रेल्वे सुरक्षा दल दलालांचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची संख्या वाढत असताना असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. प्रवाशांची दिशाभूल करून ते त्यांची लूट करीत आहेत. चार दिवसांपूर्वी एका असामाजिक तत्त्वाने तिकिटाची नोंद करायची असल्याचे सांगून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचे तिकीट रद्द करून त्यांच्या तिकिटांची रक्कम पळविली होती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्र्ग पोलिसांनी असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.आरक्षण कार्यालयात हवी पोलिसांची ड्युटीआरक्षण कार्यालयात तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची रांग असते. गर्दीचा फायदा घेऊन असामाजिक तत्त्व प्रवाशांचे पाकीट, महागडे मोबाईल चोरी करतात. परंतु रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस आरक्षण कार्यालयात ड्युटीवर राहत नसल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावते. त्यामुळे आरक्षण कार्यालयात आरपीएफ जवान, लोहमार्ग पोलिसांची ड्युटी लावण्याची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरCrime Newsगुन्हेगारी