शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपुरातील शासकीय रुग्णालयांना होतोय निकृष्ट पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 10:45 IST

शासकीय रुग्णालयांना रुग्णाच्या एक वेळच्या नाश्त्यासह दोन वेळच्या भोजनासाठी केवळ २५ रुपये शासनाकडून मिळतात. या पैशात ४ रुपये ६६ पैसे प्रति किलोच्या दराचा गहू तर ६ रुपये ३५ पैसे प्रति किलोच्या दराचा तांदूळ विकत घेतला जातो. परंतु या किमतीत पोचट गहू व बुरशीमिश्रित तांदूळ मिळतो. या धान्यातून रुग्णांसाठी खरच पोषक आहार तयार होतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या जीवाशीच खेळतांदळाला बुरशी, सडका गहू

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजाराला लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत पोषक आहाराची गरज असते. परंतु शासकीय रुग्णालयांना रुग्णाच्या एक वेळच्या नाश्त्यासह दोन वेळच्या भोजनासाठी केवळ २५ रुपये शासनाकडून मिळतात. या पैशात ४ रुपये ६६ पैसे प्रति किलोच्या दराचा गहू तर ६ रुपये ३५ पैसे प्रति किलोच्या दराचा तांदूळ विकत घेतला जातो. परंतु या किमतीत पोचट गहू व बुरशीमिश्रित तांदूळ मिळतो. या धान्यातून रुग्णांसाठी खरच पोषक आहार तयार होतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये आहारातज्ज्ञाच्या देखरेखेखाली आहार तयार केला जातो. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या (डीएमईआर) अंतर्गत येणाऱ्या शासकीय रुग्णालयांमधील प्रति रुग्णाच्या आहारावर शासन २५ रुपये खर्च करते. परंतु महागाईने आपला उच्चांक गाठला असताना एवढ्या पैशाता एकवेळच्या नाश्त्यासह दोन वेळच्या जेवण्याची सोय करणे रुग्णालय प्रशासनाला कठीण झाले आहे. पूर्वी प्रत्येक रुग्णाला मिळणारे दूध, शेंगदाण्याचा लाडू, उकडलेली अंडी व ‘नॉनव्हेज’ जेवण आता बंद झाले आहे. आता केवळ लहान मुलांना व ‘लिक्वीड’ आहारावर असलेल्या रुग्णांनाच दूध तर इतरांना चहा व ब्रेड किंवा उसळ दिली जाते. तर दुपार आणि सायंकाळच्या भोजनात पातळ वरण, भात, बाजारात जी भाजी स्वस्त असेल ती भाजी आणि पोळी एवढाच मेनू असतो.जास्तीत जास्तवेळा भोपळ्याची भाजीच रुग्णांच्या नशिबी ठरलेली असते.

आता गेल्या काही वर्षांपासून गव्हाचा आणि तांदळाचा दर्जा घसरल्याने रुग्णाच्या आहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राष्टÑ निर्माण संघटनेचे सचिव व सामाजिक कार्यकर्ता नीलेश नागोलकर यांनी तर मेडिकलला मिळणारे निकृष्ट दर्जाचे गहू व तांदळाचे नमुनेच ‘लोकमत’ला आणून दाखविले. आहारासाठी निकृष्ट धान्य नकोचरुग्णाची आधीच रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. ती वाढण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची ठरते. परंतु निकृष्ट दर्जाच्या धान्यातून आहार तयार केला जात असेल तर ते चुकीचे आहे. रुग्णांचा आहारासाठी दर्जेदार धान्य असायला हवे, तरच रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होईल.-कविता गुप्ता, आहारतज्ज्ञ

रुग्णांच्या आहाराकडे शासनाने लक्ष द्यायला हवेमेयो, मेडिकलमध्ये पुरवठा होणाऱ्या धान्य व इतरही वस्तूंचा दर्जा हा सुमार व अनेकवेळा निकृष्ट दर्जाचा असतो. अन्न प्रशासनाने (एफडीए) यापूर्वीही यावर आक्षेप घेतला आहे. शासकीय रुग्णालयात खेड्यापाड्यातून व दुर्गम भागातून गोरगरिब रुग्ण येतात. यामुळे त्यांना दिला जाणाऱ्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.-नीलेश नागोलकर, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय