शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात रोशन शेखवर कारागृहात हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मोक्काच्या गुन्ह्यात साथीदारांसह कारागृहात असलेला कुख्यात गुंड रोशन कयूम शेख (३१) याच्यावर कारागृहातीलच चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मोक्काच्या गुन्ह्यात साथीदारांसह कारागृहात असलेला कुख्यात गुंड रोशन कयूम शेख (३१) याच्यावर कारागृहातीलच चार गुंडांनी जोरदार हल्ला चढवला. त्याची आधी बेदम धुलाई केली आणि नंतर धारदार शस्त्राने त्याला भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कारागृह रक्षक आणि इतर गुन्हेगारांनी वेळीच धाव घेतल्याने रोशन बचावला. रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास येथील मध्यवर्ती कारागृहात ही खळबळजनक घटना घडली.

महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करणारा तसेच ठार मारण्याची धमकी देऊन लाखोंच्या मालमत्तेवर कब्जा मारणाऱ्या कुख्यात रोशनला वर्षभरापूर्वी पोलिसांनी धरमपेठेतील एका व्यावसायिकाचे गाळे हडपून त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. चाैकशीत तो श्रीमंत महिलांशी मैत्री करून त्यांची शारीरिक गरज पूर्ण करतो आणि नंतर तो व्हिडीओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करतो, असे उघड झाले होते. यातून त्याने कोट्यवधींची माया जमविली आहे. पोलिसांनी त्याच्यासह साथीदारांवर मोक्का लावला होता. तपास संपल्यानंतर त्याला १० जून २०२० ला कारागृहात डांबण्यात आले. तेव्हापासून तो कारागृहातच आहे. येथेही तो गुंडगिरी करतो. त्यामुळे त्याचे अनेकांशी पटत नाही. आरोपी जतीन ऊर्फ जय योगेश जंगम (१८) , जेरान ऊर्फ बंटी जॉर्ज निकोलस (२२), विशाल नारायण मोहरले (१९) आणि अरनॉल्ड ऊर्फ शेल्टीन क्रिस्टोफर (१९) यांच्यासोबत त्याची अनेक दिवसांपासून कुरबुर सुरू आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ९.३० ला रोशन आंघोळ करून बरॅक क्रमांक ३ आणि ४ जवळ आला. येथे उभा असलेल्या जतीन जंगम, जेरान ऊर्फ बंटीला त्याने घाणेरड्या शिव्या घातल्या. त्यामुळे या दोघांनी त्याच्यावर झडप घेतली. ते पाहून त्यांचे साथीदार विशाल मोहरले आणि अरनॉल्ड यांनीही रोशनला बदडणे सुरू केले. बेदम धुलाई करतानाच एकाने कारागृहातील भांड्याला घासून बनविलेल्या सुरीसारखे शस्त्र काढले. जीव धोक्यात असल्याचे पाहून रोशन ‘बचाओ’, ‘बचाओ’ करू लागला. त्यामुळे कारागृह रक्षक तसेच काही बंदीवान मदतीला धावले. त्यांनी रोशनची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. शस्त्र लागल्याने रोशनला जखमा झाल्या होत्या. म्हणून त्याला लगेच मेडिकलला रवाना करण्यात आले. माहिती कळताच कारागृह अधीक्षक अनूपकुमार कुमरे यांनी लगेच कारागृहात धाव घेतली. त्यांनी सर्व आरोपींना वेगवेगळ्या बराकीत हलविले आणि धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी रोशनच्या बयानावरून सायंकाळी गुन्हा दाखल केला.

---

चारही आरोपी कुख्यात गुन्हेगार

आरोपी जतीन जंगम, जेरान ऊर्फ बंटी हे दोघे सदरमधील हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. विशाल नारायण मोहरले (१९) हा हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. हे तिघेही ८ सप्टेंबर २०२० पासून आत आहेत, तर त्यांचा साथीदार अरनॉल्ड ऊर्फ शेल्टीन क्रिस्टोफर हा जरीपटक्यातील हत्याप्रकरणात आरोपी असून, तो ३ ऑक्टोबर २०१९ पासून कारागृहात आहे.

---