शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात पंकज धोटेच्या मुसक्या बांधल्या

By admin | Updated: July 14, 2017 02:38 IST

गुन्हेगारी वैमनस्यातून प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणावर गोळीबार करून खळबळ उडवून देणाऱ्या कुख्यात पंकज धोटे याच्या मुसक्या बांधण्यात

गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई : पिस्तूल अजून सापडलेच नाही लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारी वैमनस्यातून प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणावर गोळीबार करून खळबळ उडवून देणाऱ्या कुख्यात पंकज धोटे याच्या मुसक्या बांधण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले आहे. सावनेरजवळ अटक करून त्याला गुरुवारी सायंकाळी नागपुरात आणण्यात आले.माजी नगरसेवक मामा धोटेंचा मुलगा असलेला पंकज गुन्हेगारी जगतात आपला दबदबा निर्माण करू पाहत आहे. गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड सुमित ठाकूर याच्याशी पंकजचे वैर आहे. विविध वादग्रस्त प्रकरणातील मांडवली, त्यातून मिळणारी लाखोंची रक्कम, हप्ता वसुली, जमिनीचे कब्जे आदीच्या मुद्यावरून सुमित ठाकूर आणि त्याच्या टोळीतील गुंडांसोबत वाद सुरू आहे. अशाच एका लाखोंच्या व्यवहारातुन तीन दिवसांपासून पंकज आणि सुमितचे तीन दिवसांपासून फोनवर भांडण सुरू आहे. त्यांनी एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्याही दिल्या आहे. पोलिसांनी सुमितवर नजर रोखल्यामुळे तो साथीदारांच्या वाहनात फिरूनच आपले काम आटोपतो. हेमंत वानखेडे हा सुमितचा साथीदार आहे. बोरगावमधील दिनशा फॅक्टरी चौकाजवळ शंभू कॅन्टीन जवळ बुधवारी रात्री हेमंतची कार उभी दिसल्याने सुमित आतमध्ये बसून असावा, असा अंदाज बांधून पंकजने हेमंतला शिवीगाळ केली. तू सुमित ठाकूर के साथ घुमता है, कहा है वो, असे म्हणत त्याच्यावर कारच्या मागच्या बाजूने गोळीबार केला. हेमंत खाली वाकल्याने बचावला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. गिट्टीखदान पोलिसांसह मोठा ताफा तेथे दाखल झाला. तोपर्यंत आरोपी पंकज त्याच्या साथीदारांसह फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके कामी लागली. छिंदवाड्याकडे आश्रयआरोपी पंकज या घटनेनंतर त्याच्या गुंड साथीदारांसह फरार झाला. येथील एका गुंडाच्या इशाऱ्यावरून तो छिंदवाड्याकडे पळाल्याचे कळताच पोलीस त्याच्या मागावर गेले. गुरुवारी सायंकाळी तो सावनेरजवळ हाती लागला. त्याला पकडून गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरात आणले. त्याला उद्या कोर्टात हजर केले जाणार असून, त्याचा पीसीआर मिळवण्यात येणार आहे. दरम्यान, पंकजचे आणखी साथीदार घटनेच्या वेळी होते, त्याचाही पोलीस शोध आहेत. पंकजने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र अद्याप सापडले नाही, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. त्याच्या साथीदारांचा शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.