शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन साथीदारांनीच केला कुख्यात इंदलचा गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तर नागपुरातील टॉप टेन गुन्हेगारांपैकी एक असलेला कुख्यात इंदल ऊर्फ इंद्रजित विक्रम बेलपारधी (वय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उत्तर नागपुरातील टॉप टेन गुन्हेगारांपैकी एक असलेला कुख्यात इंदल ऊर्फ इंद्रजित विक्रम बेलपारधी (वय ३५) याची हत्या करणारे त्याचेच जुने साथीदार निघाले.

वयाची १८ वर्षे पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक असलेल्या दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना दुचाकीचा कट लागला होता, त्यामुळे आरोपींचा इंदलसोबत वाद झाला. त्या वादातून त्यांनी इंदलची हत्या केल्याची माहिती पाचपावली पोलीस सांगत आहेत. मात्र, हे अर्धसत्य असल्याची चर्चा आहे. कुख्यात इंदल गेल्या अनेक वर्षांपासून पाचपावलीत बेदरकारपणे जुगार अड्डा चालवित होता. त्याने दोघांची हत्या केली होती. इतरही अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याने उत्तर नागपुरातील गुन्हेगारी वर्तुळात इंदलचा मोठा दरारा होता. पोलिसांना मोठी देण देऊन इंदल बेदरकारपणे जुगार अड्डे चालवायचा. इंदलच्या जुगार अड्ड्यावर कारवाई होत नसल्याने मोठ्या संख्येत जुगारी त्याच्याकडे हजारोंचा डाव खेळायला येत होते. त्यातून इंदलला हजारोंची नाल (कट्टा) मिळत होता. जुगार अड्ड्यावर त्याने अनेक अल्पवयीन मुले ठेवली होती. ते मुखबिरी आणि आर्थिक व्यवहार सांभाळत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, इंदलच्या अड्ड्यावरच हे दोघे आरोपी काम करायचे. त्यांनी पैशाची अफरातफर केल्याने इंदलने त्यांची बेदम धुलाई केली होती. त्यामुळे ते सुडाने पेटले होते. या पार्श्वभूमीवर, त्यांनी रविवारी रात्री दारूच्या नशेत टुन्न असलेल्या इंदलला घेरले अन् तलवार तसेच चाकूचे सपासप घाव घालून त्याचा गेम केला.

---

२० पेक्षा जास्त घाव

इंदल क्रूर स्वभावाचा होता. तो वाचला तर जिवंत सोडणार नाही, हे माहीत असल्याने आरोपींनी इंदलवर आधी तलवारीने घाव घालून त्याला हतबल केले आणि खाली कोसळताच त्याच्या शरीराला चाकूने भोसकले. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी इंदलवर २० पेक्षा जास्त घाव घातले. विशेष म्हणजे, या हत्याकांडात हे दोनच आरोपी असल्याचे पाचपावली पोलीस सांगत आहेत. मात्र, त्यांना पुढे करून सराईत गुन्हेगारांनी इंदलचा गेम केल्याची जोरदार चर्चा आहे.

---

‘सैया भये कोतवाल, फिर डर काहे का’

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे कडक निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. त्या भागातील गुन्हेगारांवर खास नजर ठेवण्याचेही सांगितले आहे. मात्र, पाचपावलीतील अनेक कुख्यात गुन्हेगार मोकाट आहेत. जुगार अड्डे, दारूचे गुत्ते, मटका अड्ड्यांसह अनेक अवैध धंदे बिनबोभाट सुरू आहेत. ‘सैया भये कोतवाल, फिर डर काहे का’ अशा अविर्भावात पाचपावलीत अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी पाचपावली पोलीस ठाण्याकडे कसे लक्ष घालतात, त्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

---