शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियाच्या कौन्सिल जनरलनी केले ऊर्जामंत्र्यांचे कौतुक

By admin | Updated: March 21, 2017 01:46 IST

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या अडीच वर्षांत ऊर्जा विभागात धाडसी निर्णय घेत या खात्यात नवी ऊर्जा भरली.

रेडियंट महाराष्ट्र कॉफीटेबल बुकची घेतली दखल : राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाची गतिमान वाटचालनागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या अडीच वर्षांत ऊर्जा विभागात धाडसी निर्णय घेत या खात्यात नवी ऊर्जा भरली. या गतिमान वाटचालीची माहिती देणाऱ्या ‘रेडियंट महाराष्ट्र’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इंडोनेशियाच्या कौन्सिल जनरलने या पुस्तकातील निर्णयांची दखल घेत ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे कौतुक केले आहे.या पुस्तकाद्वारे राज्यातील ऊर्जाक्रांतीची दखल देश-विदेशात घेतली जाऊ लागली आहे. मुंबईतील इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल सॉत सिरिंगोरिंगो यांनी यासंदर्भात पाठविलेल्या पत्रात ऊर्जा मंत्रालयाच्या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे देशातील इकॉनॉमिक पॉवर हाऊस म्हणून लवकरच पुढे येईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर ऊर्जा विभागाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आली. त्यानंतर त्यांनी दररोज १८ ते २० तास काम करण्याचा धडाका लावला. ऊर्जाबचतीपासून ते ऊर्जानिर्मितीतील खर्चात बचत करण्यापर्यंत अनेक उपाय योजले. तसेच भविष्यातील ऊर्जेची गरज आणि त्याचे नियोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी कृषी फिडर वेगळे करण्याचा निर्णय कौन्सिल जनरल यांनी अधोरेखित केला. हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरेल, असेही कौन्सिल जनरल यांनी म्हटले आहे. सध्या पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीवर जगात सगळीकडे भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात पर्यावरणपूरक ऊर्जेसाठी पवनऊर्जा, सौरऊर्जा, कृषी टाकाऊ पदार्थ, उसाची चिपाडे या स्रोतांपासून १४ हजार ४०० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे या पत्रातून नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य हे वीज तुटवड्याऐवजी मागणीपेक्षा जास्त वीजनिर्मिती करण्याकडे वाटचाल करीत असल्याची बाब आनंददायी असल्याचेही पत्रात म्हटले आहे. रेडियंट महाराष्ट्र या पुस्तकाचे संपादन मराविमं सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)