शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिगो’चे अहमदाबादमार्गे नागपूर-कोल्हापूर विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 11:20 IST

Nagpur News मंगळवारपासून इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-कोल्हापूर विमानसेवा अहमदाबादमार्गे सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपहिले विमान रवानाप्रवाशांची मागणी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनलॉकमध्ये नागपुरातून विमान आणि प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. याअंतर्गत मंगळवारपासून इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-कोल्हापूर विमानसेवा अहमदाबादमार्गे सुरू झाली आहे. पहिल्या विमानाचे उड्डाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मंगळवारी झाले.

नागपूर-कोल्हापूर सेवेंतर्गत इंडिगोच्या विमानाचे दुपारी ४.२५ वाजता उड्डाण झाले. यामुळे नागपुरातून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची मागणी पूर्ण झाली आहे. नागपुरातून तीन दिवस उड्डाण भरणारे हे विमान नागपुरातून अहमदाबादमार्गे कोल्हापूरला मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उड्डाण करणार आहे. हे विमान कोल्हापूरला पोहोचल्यानंतर परत अहमदाबादमार्गे नागपुरात येणार आहे. या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी होती.

कोल्हापूरसाठी पहिल्यांदाच सेवा

नागपुरातून कोल्हापूरकरिता ही सेवा पहिल्यांदाच सुरू झाली आहे. सध्या नागपूर विमानतळावर विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी नागपूर विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या तीन वा चार होती. स्थिती सामान्य होऊ लागताच सध्या १७ ते १८ विमाने दररोज उड्डाण करीत आहेत. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे आणि बेंगळुरू येथे उड्डाणे होत आहेत.

टॅग्स :Indigoइंडिगो