शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

चीनला पर्याय होण्याची भारतात क्षमता  : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:50 IST

जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘कोरोना’च्या संकटाचे संधीत रूपांतर हवे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या संकटामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. जपान, अमेरिकेसारखे देश चीनमधील त्यांचे उद्योग दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्याच्या विचारात आहेत. इतरही देश असे पाऊल उचलू शकतात. अशास्थितीत जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. सोमवारी सायंकाळी भारतीय शिक्षण मंडळाच्या ‘फेसबुक पेज’वर गडकरी यांनी ‘कोरोनानंतरच्या औद्योगिक संधी व आव्हाने’ या विषयावर भाष्य केले.‘कोरोना’मुळे युरोप, अमेरिकेत तर चिंताजनक स्थिती आहे. या देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती नियंत्रणात आहे. परंतु अद्याप संकट संपलेले नाही. या संकटाचा काही दिवस सामना करावा लागेल. येत्या महिनाभरात स्थिती नक्कीच सुधारेल, हा विश्वास आहे. ‘कोरोना’च्या संकटाचा दोन भागात विचार करायला हवा. केंद्र शासनाने जारी केलेल्या नव्या धोरणांमुळे औषधांचा कच्चा माल चीनकडून मागविण्याची आवश्यकता राहणार नाही. आपल्याकडेच त्याचे उत्पादन होऊ शकेल. शिवाय देशात चार वैद्यकीय उपकरणांचे ‘पार्क’ उभारण्यात येणार असून, त्यामुळे ही उपकरणे देशातच बनू शकतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘कोरोना’नंतर काय, यासंदर्भात आतापासूनच नियोजन आवश्यक आहे. जगाला विविध गोष्टींचे निर्यात करणारा भारत ‘हब’ बनू शकतो. या माध्यमातून आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येऊ शकते व निर्यात वाढू शकते. यासाठी भविष्याला डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधांचा विकास, उद्योगक्षेत्रातील आव्हाने यावर भर देण्याची गरज आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Gadkariनितीन गडकरी