शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत बंद; नागपुरात आंदोलकांनी २५ मिनिटे रोखली तामिळनाडू एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 20:19 IST

दलित संघटनांनी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या संदर्भात केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीकडे जाणारी तामिळनाडू एक्स्प्रेस सोमवारी दुपारी अर्धा तास रोखुन धरल्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला.

ठळक मुद्देगुरुद्वारा पुलावरील घटनामालगाडीच्या लोकोपायलटची कॉलर पकडून दगडफेक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दलित संघटनांनी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या संदर्भात केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीकडे जाणारी तामिळनाडू एक्स्प्रेस सोमवारी दुपारी अर्धा तास रोखुन धरल्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला. रेल्वे सुरक्षा दलाने आंदोलकांना बाजूला सारुन ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली.भारत बंद दरम्यान दलित संघटनांचे कार्यकर्ते नागपुरात आंदोलन करीत होते. दुपारी २.५० वाजता आंदोलक गुरुद्वारा पुलाजवळून जात होते. तेवढ्यात सिग्नल न दिल्यामुळे आऊटरवर थांबलेली मा

लगाडी त्यांना दिसली. आंदोलक गुरुद्वाराजवळील पुलावर चढले. आधीच थांबलेल्या मालगाडीच्या समोर ते उभे झाले. आंदोलनकर्त्यांनी मालगाडीवर दगडफेक करून लोकोपायलटची कॉलर पकडली. मालगाडीला ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे ती निघाली असताना पुन्हा आंदोलनकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे मालगाडीच्या लोकोपायलटने मालगाडी थांबविली. जवळपास १०० आंदोलक मालगाडीच्या समोर उभे होते. तेवढ्यात रेल्वेगाडी क्रमांक १२६२१ चेन्नई-दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस दिल्लीकडे जात होती. रेल्वे रुळावर आंदोलकांचा जमाव पाहून तामिळनाडू एक्स्प्रेसच्या लोकोपायलटने दुपारी २.५१ वाजता गाडी थांबविली. रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रुळावरील आंदोलकांना बाजूला केले. त्यानंतर दुपारी ३.१६ वाजता तामिळनाडू एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. तब्बल २५ मिनिटे आंदोलकांनी ही गाडी रोखून धरली होती. आंदोलनकर्त्यांना रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे रुळावरून हटविल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाला.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा