शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ व विजेसाठी आंदोलन

By admin | Updated: October 4, 2015 03:23 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य आणि विजेच्या प्रश्नासाठी विदर्भभर आंदोलन पेटवू, असा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी केला.

धरणे आंदोलन : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा संकल्प नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य आणि विजेच्या प्रश्नासाठी विदर्भभर आंदोलन पेटवू, असा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे काटोल रोड चौक येथील वीज महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्येसुद्धा धरणे आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, या मुख्य मागणीसह विदर्भातील जनतेसाठी सगळ्या स्लॅबमधील विजेचे दर आजच्या पेक्षा निम्म्यावर आणावे. विदर्भात कोळशावर आधारित अधिकच्या वीज निर्मितीकरिता ४० मान्यताप्राप्त व ९२ इतर प्रस्तावित प्रकल्प मिळून एकूण १३२ प्रकल्पांची मान्यता रद्द करण्यात यावी, चंद्रपूर, कोराडी, मौदा, पारस या शहरांमध्ये विजेमुळे निर्माण होणारे प्रदूषण प्राधान्याने हटविण्यात यावे, शेतकऱ्यांचा कृषीपंपाचा बॅकलॉग तातडीने दूर करा आणि शेती पंपाचे १८ तासांचे लोडशेडिंग बंद करून २४ तास पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी, आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनाचे हे सत्र असेच सुरू राहणार असून यानंतर ९ आणि २५ आॅक्टोबररोजी सुद्धा आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. धरणे आंदोलनात राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. नंदा पराते, अरुण केदार, दिलीप नरवडिया, धर्मराज रेवतकर, विष्णू आष्टीकर, श्याम वाघ, अनिल तिडके, राजेश श्रीवास्तव, भीमराव फुसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)