शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यारोपण केंद्रांना मिळणार स्वतंत्र व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:30 IST

अवयवदान केल्यामुळे आपण एका व्यक्तीला नवीन जीवन देऊ शकतो ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये रुजविण्यासाठी .....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कुर्वे : अवयवदानाला प्रोत्साहनासाठी एक कोटी रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवयवदान केल्यामुळे आपण एका व्यक्तीला नवीन जीवन देऊ शकतो ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये रुजविण्यासाठी आयएमएसह समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. अवयवदानासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा विकास निधीमधून पाच व्हेंटिलेटरसाठी एक कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अवयवदान समन्वय समितीची बैठक पार पडली. येत्या १३ आॅगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. आयएमएच्या नागपूर शाखेतर्फे अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी नियोजना संदर्भातही आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. वैशाली खंडाईत, मानद सचिव डॉ. प्रशांत राठी, अवयवदान संदर्भातील आंतरराष्ट्रीय संघटनेचे सचिव डॉ. रवी वानखेडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, डॉ. सचिन हिवसे, डॉ. समीर सुरेंद्रकुमार जहागीरदार, जिल्हा शल्य चित्किसक डॉ. हेमंत निंबाळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र्र सवई, आयजीएमसीचे डॉ. सुरेश मोहता, डॉ. सविता मुकादम, राजेंद्र्र निकाजु आदी उपस्थित होते.ब्रेनडेड झालेल्या रुग्णांची माहिती अवयवदानासंदर्भात प्रत्यारोपणाची सुविधा असलेल्या जिल्हातील सात केंद्रांना देणे अनिवार्य आहे. अवयवदानासंदर्भात अशा रुग्णांच्या नातेवाईकांना समुपदेशन करणे आवश्यक आहे. या संदर्भात नोडल अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयएमएतर्फे सुद्धा अशा रुग्णांची माहिती प्रत्यारोपण तसेच अवयवदानासंदर्भातील रिटरिव्हल केंद्रांना द्यावी या संदर्भात सर्व सभासदांना कळवावे.अवयवदानासंदर्भात दरमहिन्याला किमान पाच विविध अवयवदान होईल या दृष्टीने आरोग्य उपसंचालकासह आयएमएच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.जागतिक अवयवदान दिनी भव्य रॅलीजागतिक अवयवदानदिनानिमित्त १३ आॅगस्ट रोजी आयएमए तसेच जिल्हा प्रशासनातर्फे लक्ष्मीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह (दीक्षाभूमी) येथून सकाळी ७ वाजता अवयवदान जागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये रोटरी क्लब, जेसीस, जनआक्रोश, मोहन फाऊंडेशन, वाहतूक शाखा, महानगर पालिका, तसेच जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील.