शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:19 IST

राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल.

ठळक मुद्देभूषणकुमार उपाध्याय : सरकारी फंडातून होणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल. त्यात प्रशिक्षित मनुष्यबळ असेल. या यंत्रणेवर केला जाणारा खर्च शासनाकडून मिळणाºया फंडातून केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांना दिली.डॉ. उपाध्याय गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आहेत. भायखळा कारागृहात मंजुळा शेट्ये तसेच त्यानंतर नागपूर कारागृहात आयुष पुगलियाच्या हत्याकांडाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली.विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या खतरनाक गुन्हेगारांना सांभाळण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनावर असते. कोणत्या गुन्हेगाराच्या मनात काय सुरू आहे, ते कळणे शक्य नाही. प्रत्येक गुन्हेगारावर लक्ष ठेवणे अपुºया मनुष्यबळामुळे शक्य होत नाही. त्यामुळे अशा घटनांवर किंवा नेहमी होणाºया हाणामाºयांवर लक्ष ठेवणे शक्य नाही. हे सर्व लक्षात घेता पोलिसांप्रमाणेच कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारण्याची तयारी चालविली आहे. सध्या कारागृह प्रशासनात कैद्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि त्यांना सांभाळण्याची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचाºयांचे संख्याबळ फारच तोकडे आहे. सुरक्षेच्या मानकानुसार सात कैद्यांना सांभाळण्यासाठी एक सुरक्षा रक्षक असावा. मात्र, सध्या एक सुरक्षा रक्षक २० ते २५ कैद्यांना सांभाळत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कारागृहातील कैद्यांच्या भानगडींवर लक्ष ठेवणे शक्य नाही. अशा स्थितीत गुप्तचर यंत्रणेसाठी स्वतंत्र आणि प्रशिक्षित कर्मचारीच नेमावे लागणार आहे. त्यासाठी येणारा खर्च सरकारने उपलब्ध करून द्यावा, असा विनंतीवजा प्रस्ताव आम्ही सरकारला पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असून, लवकरच राज्यातील कारागृहात गुप्तचर यंत्रणा कार्यरत होणार आहे. कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांमधील वाद तसेच अन्य प्रकारावर ही यंत्रणा लक्ष ठेवेल. तसा दैनंदिन अहवाल ते कारागृह प्रशासनाला कळवतील. त्यामुळे कारागृहात घडू पाहणारे संभाव्य गुन्हे टाळता येतील, असेही ते म्हणाले.अनेक गुन्हे टळलेप्रायोगिक स्तरावर काही कारागृहात गुप्तचर पेरण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हे टळल्याचा दावाही डॉ. उपाध्याय यांनी केला. हे गुन्हे टळल्यामुळे ते चर्चेला आले नाही, असे सांगतानाच घटना घडल्या की त्याची चर्चा होते, मात्र घटना घडलीच नाही तर त्याची चर्चा होण्याचा प्रश्नच नाही, अशी पुष्टी त्यांनी आपल्या दाव्याला जोडली.सुरक्षेसाठी प्लास्टिकचा वापरमंजुळा शेट्येची हत्या झाली मात्र काही कटकारस्थान करून झालेली नाही. अचानक घडलेली ही घटना आहे. काही अधिकारी-कर्मचाºयांच्या चुकीमुळे हे घडले, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. यापुढे असा प्रकार घडणार नाही, त्यासाठी आम्ही समुपदेशनावर भर देणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.आयुष पुगलियाची हत्या आणि अन्य काही ठिकाणी झालेल्या हाणामाºयात कैद्यांनी अ‍ॅल्युमिनियमच्या ताटाचा, अन्य भांड्याचा शस्त्रासारखा वापर केला आहे. ते लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये आता कैद्यांना जेवणासाठी ताट (प्लेट) आणि वाट्या तसेच ग्लासदेखील प्लास्टिकचेच वापरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.