शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

नागपुरातील मेडिकलमध्ये ‘मेटाबोलिक सिंड्रोम’चा स्वतंत्र विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 19:59 IST

जगात सुमारे २५ टक्के लोकसंख्या ही ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ने पीडित आहेत. लठ्ठपणा आणि आळशी वृत्तीच्या जीवनशैलीमुळे ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ (चयापचय संदर्भातील विकृती दर्शविणारी लक्षणे) वाढत आहे. यामुळे ‘टाईप-२’ मधुमेह व हृदयाच्या रक्तवाहिन्या संदर्भातील आजार वेळेपूर्वी होण्याचा धोका असतो. भारतात याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. याची दखल घेऊन मेडिकल प्रशासनाच्या पुढाकाराने रुग्णालयात याचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा प्रयत्न असून नुकतेच स्वीडन देशातील डॉक्टरांच्या चमूने रुग्णालयाची पाहणी करून याला सकारात्मकता दाखवली आहे.

ठळक मुद्देस्वीडनच्या डॉक्टरांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात सुमारे २५ टक्के लोकसंख्या ही ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ने पीडित आहेत. लठ्ठपणा आणि आळशी वृत्तीच्या जीवनशैलीमुळे ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ (चयापचय संदर्भातील विकृती दर्शविणारी लक्षणे) वाढत आहे. यामुळे ‘टाईप-२’ मधुमेह व हृदयाच्या रक्तवाहिन्या संदर्भातील आजार वेळेपूर्वी होण्याचा धोका असतो. भारतात याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. याची दखल घेऊन मेडिकल प्रशासनाच्या पुढाकाराने रुग्णालयात याचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा प्रयत्न असून नुकतेच स्वीडन देशातील डॉक्टरांच्या चमूने रुग्णालयाची पाहणी करून याला सकारात्मकता दाखवली आहे.मेटाबोलीक सिंड्रोमचा धोका वाढत्या वयात वाढत जातो. कंबरेच्या आजूबाजूला खूप जास्त चरबी हे मेटाबोलीक सिंड्रोमची शंका वाढविते. शिवाय, ज्यांना ‘ट्रायग्लिसराइड्स’ची औषध सुरू असल्यास आणि ‘सीरम एचडीएल’ पुरुषांमध्ये ४० मिग्रा. पेक्षा कमी आणि महिलांमध्ये ५० मिग्रा. पेक्षा कमी असल्यास आणि रक्तदाब १३०/८५ एमएम पेक्षा जास्त असल्यास किंवा रक्तदाबावर औषधोपचार सुरू असल्यास, याशिवाय रिकामे पोट असताना प्लाज्मा ग्लुकोजचे प्रमाण १०० मिग्रा. पेक्ष जास्त असल्यास किंवा ‘अ‍ॅलीवेटेड ब्लड ग्लुकोजवर’ उपचार सुरू असल्यास ही लक्षणेही मेटाबोलीक सिंड्रोमसाठी कारणीभूत ठरतात. परिणामी, टाईप-२ मधुमेह आणि हृदयाच्या रक्तवाहिनी संदर्भातील आजार होण्याचा धोका वाढतो. या सोबतच ‘फॅटी लिव्हर’, ‘फायब्रोसिस’ आणि ‘सिरोसीस’, ‘हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा’, गंभीर मूत्रपिंडाचे आजार, ‘पोलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम’, झोपेशी जुळलेल्या श्वसनाशी संबंधित समस्या आदी दुष्परिणाम पहायला मिळतात. अशा रुग्णांचे वेळीच निदान होऊन त्याला औषधोपचाराखाली आणण्यासाठी ‘मेटाबोलीक सिंड्रोम’चा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा मेडिकलचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्वीडन देशातील डॉक्टरांनी मदतीचा हात समोर केला आहे. शनिवार ५ मे रोजी स्वीडन येथील चार डॉक्टरांच्या चमूने मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभागाची पाहणी करून काही डॉक्टरांसोबत चर्चाही केली. लवकरच यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdiabetesमधुमेह