शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फेरफार अर्जासाठी आता स्वतंत्र संकलन केंद्र

By admin | Updated: September 20, 2015 03:15 IST

शासकीय कामांमधील मध्यस्तांची भूमिका कमी करून भ्रष्टाचार कसा कमी करता येईल, यावर

सेतू कार्यालयात सुविधा : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची माहितीनागपूर : शासकीय कामांमधील मध्यस्तांची भूमिका कमी करून भ्रष्टाचार कसा कमी करता येईल, यावर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा विशेष भर आहे. विविध प्रमाणपत्र वितरित करण्याचा कालावधी निश्चित करणे, कामांबाबत काय प्रगती आहे याची माहिती संबंधितांना एसएमएसद्वारे पोहोचविणे आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई केल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा ‘फेरफार संबंधी प्रकरणांकडे वळविला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात आता स्वतंत्र फेरफार अर्ज संकलन केंद्र सुरू करण्यात येत आहे.यासंदर्भात अधिक माहिती देतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले की, नगर भूमापन अधिकारी क्रमांक १,२, व ३ नागपूर यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर फेरफार अर्ज प्राप्त हेतात. सद्यस्थितीत नगर भूमापन अधिकारी यांचे कार्यालयातील एक खिडकीमध्ये फेरफार अर्ज स्वीकारले जातात. परंतु अर्ज स्वीकृती वेळी त्या अर्जावर किती कालावधीत कार्यवाही केली जाईल, याबाबत माहिती दिली जात नाही. त्यामुळे अर्जदारास नगर भूमापन अधिकारी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यातूनच मध्यस्त वाढीस लागतात आणि भ्रष्टाचाराला वाव मिळतो. शासनाची जनमानसातील प्रतिमा बिघडते. यावर उपाय म्हणून सेतू कार्यालयात स्वतंत्र फेरफार अर्ज संकलन केंद्र सुरू करण्यात येत आहे. यापुढे नगर भूमापन कार्यालयास प्राप्त होणारे फेरफार अर्ज फक्त सेतू कार्यालयातील संकलन केंद्रावरच स्वीकारण्यात येतील. नगर भूमापन कार्यालयात फेरफार अर्ज स्वीकृतीची कार्यवाही यापुढे बंद करण्यात येत आहे. याबाबत जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक पुणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनीही यास मंजुरी दिली आहे. आता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी सदर केंद्रावर नगर भूमापन अधिकारी निहाय फेरफार अर्ज स्वीकृतीसाठी ३ परीक्षण भूमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. केंद्रांवरील कर्मचारी अर्ज स्वीकृती करताना अर्जाची परिपूर्ण छाननी करून अर्ज स्वीकारतील. अर्जासोबत फेरफारसाठी आवश्यक परंतु सादर न केलेल्या कागदपत्रांची लेखी स्वरूपातील माहिती त्याच वेळी संबंधित अर्जदारांना देण्यात येईल. अर्ज स्वीकृतीवेळी अर्जदारास पोहोच देण्यात येईल. सदर पोहोचवर किती दिवसात, कोणत्या तारखेपर्यंत कार्यवाही करण्यात येईल, याची माहिती देण्यात येईल. दिवसभरात स्वीकृत केलेले अर्ज एक खिडकीतील कर्मचारी नगर भूमापन कार्यालयनिहाय छाननी करून संबंधित नगर भूमापन अधिकारी ठरवून दिलेल्या मुदतीत नियमानुसार परिपूर्ण कार्यवाही करतील व अर्जदारास निकाली उत्तराने कळवतील. अर्जदाराचा मोबाईल नंबर अर्जावर घेण्यात येईल. अर्जाबाबतच्या कार्यवाहीची स्थिती अर्जदारास एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. दरमहा किती अर्ज आले, किती अर्जावर कार्यवाही झाली, किती शिल्लक आहेत याबाबतची सांख्यिकीय माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येईल. (प्रतिनिधी)