शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांमध्ये वाढतोय मधुमेह

By admin | Updated: July 27, 2014 01:27 IST

गर्भावस्थेत मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी गर्भवतीच्या सुरुवातीलाच प्राथमिक तपासण्या होणे आवश्यक आहे. महिलांमध्ये वाढत्या मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी मधुमेह विशेषतज्ञासोबतच स्त्रीरोग,

डायबेटीज केअर फाऊंडेशन : दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटननागपूर : गर्भावस्थेत मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी गर्भवतीच्या सुरुवातीलाच प्राथमिक तपासण्या होणे आवश्यक आहे. महिलांमध्ये वाढत्या मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी मधुमेह विशेषतज्ञासोबतच स्त्रीरोग, बालरोग, आहार आणि ‘डायबेटीज एज्युकेटर’ यांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय तंत्रज्ञान व विज्ञान विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी येथे केले.डायबेटीज केअर फाऊंडेशनच्यावतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्रतज्ज्ञ डॉ. प्रभा भट्टाचार्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी उपस्थित होते. प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता प्रास्ताविकेत म्हणाले, गर्भावस्थेत मधुमेहाचा वाढते प्रमाण वैद्यक शास्त्रासमोर चिंतनाचा विषय ठरत आहे. एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के महिला गर्भावस्थेतल्या मधुमेहाचा सामना करतात. त्यापैकी प्रत्येक पाच महिला भविष्यातही ‘टाईप टू’ या प्रकारातल्या मधुमेहाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत, असे सांगून त्यांनी दोन दिवसीय परिषदेची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार मांडले. संचालन डॉ. चारू बाहेती ,डॉ. सरिता उगेमुगे व कविता गुप्ता यांनी केले तर आभार डॉ. राजेश अटल यांनी मानले. दिवसभर चाललेल्या परिषदेत डॉ. शैलजा काळे, डॉ. शशांक जोशी, डॉ. उदय थानावाला, डॉ. शिल्पा जोशी, डॉ. समर बॅनजी आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेत देशभरातून ३५० डॉक्टर सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)