शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बुबुळाच्या अंधत्वाचे प्रमाण वाढतेय

By admin | Updated: August 25, 2014 01:17 IST

जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबुळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे.

अशोक मदान यांची माहिती : उद्यापासून नेत्रदान पंधरवडा नागपूर : जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबुळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी अशा तीस हजार रुग्णांची भर पडत आहे. नागपुरातील एकट्या मेडिकल रुग्णालयात दरवर्षी ६० नवे रुग्ण आढळून येत आहेत. बुबुळाचे प्रत्यारोपण करून हे अंधत्व टाळता येते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) नेत्र विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी येथे दिली. नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकलच्यावतीने २५ आॅगस्टपासून पंधरवडा पाळला जाणार आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. मदान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, अंधत्व हे केवळ मोतीबिंदूमुळेच येते असे नाही, तर डोळयांना होणाऱ्या विविध आजारांमुळेही अंधत्व येऊ शकते. पारदर्शक पटल अपारदर्शक होणे हा आजार कोणत्याही वयाच्या म्हणजेच लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. डोळ्यांचे अपघात, डोळे येणे, अ-जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे, डोळ्यात कचरा किंवा रासायनिक पदार्थ गेला असल्यास इत्यादींमुळे पारदर्शक पटल खराब झाल्यास अंधत्व येऊ शकते. यावर बुबुळ प्रत्यारोपण करून अंधत्व दूर करता येते. परंतु भारतात दरवर्षी सुमारे ७५ लाख लोक मृत होऊनही फक्त पन्नास हजार नेत्रदान होतात. यातही फक्त १५ हजार बुबुळाचे प्रत्यारोपण होणे शक्य होते. याला कारण नेत्रदानाविषयी योग्य माहिती व जागरूकतेचा अभाव आहे. चांगली दृष्टी असणे हा आपल्या प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये, आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणे, ही काळाची गरज आहे. मरणोत्तर नेत्रदान करून अंध व्यक्तीच्या जीवनातील अंध:कार दूर करण्याचे पवित्र काम प्रत्येक जण करू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोेळ्याचा उपयोग दुसऱ्या अंध व्यक्तीला जग पाहण्यासाठी होत असेल, तर जगातून जाताना दोन अंध व्यक्तींना दृष्टीची अमूल्य भेट द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेत डॉ. दिलीप कुमरे व डॉ. मोना देशमुख उपस्थित होत्या.२२५ नेत्रपेढ्यांमधून ५१ सुरूराज्यात २२५ नेत्रपेढ्या आहेत, परंतु ५१ पेढ्या बंद आहेत. एकट्या नागपुरातील पाच बंद आहेत. मे २०१३ ते जून २०१४ या दरम्यान बुबुळ प्रत्यारोपणाच्या फक्त ६९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. नेत्रदानाची ही चळवळ राबविण्यासाठी शासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे नेत्ररोग विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)