शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव ‘पेन्शन’ का थांबवली? ‘ईपीएफओ’च्या कारभाराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 11:35 IST

‘ईपीएफओ’च्या भोंगळ कारभारामुळे उपराजधानीतील शेकडो ‘पेन्शनर्स’ची उतारवयात डोकेदुखी वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना अगोदर ‘ईपीएफओ’कडून वाढीव ‘पेन्शन’ सुरू करण्यात आली होती. मात्र मे महिन्यापासून यातील एकालाही ‘पेन्शन’ मिळालेली नाही.

ठळक मुद्दे‘पेन्शनर्स’ना तीन महिन्यांपासून मनस्ताप  

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ईपीएफओ’च्या भोंगळ कारभारामुळे उपराजधानीतील शेकडो ‘पेन्शनर्स’ची उतारवयात डोकेदुखी वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना अगोदर ‘ईपीएफओ’कडून वाढीव ‘पेन्शन’ सुरू करण्यात आली होती. मात्र मे महिन्यापासून यातील एकालाही ‘पेन्शन’ मिळालेली नाही. याशिवाय ज्यांना ‘अरिअर्स’ मिळाले होते, अशा ‘पेन्शनर्स’ंचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे ‘पेन्शन’धारकांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण आहे.२०१४ पूर्वी जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना वाढीव ‘पेन्शन’ देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ‘पेन्शन स्कीम ९५’अंतर्गत नागपुरातील अनेक ‘पेन्शनर्स’नी ‘ईपीएफओ’कडे अर्ज केले होते. नियमानुसार अनेकांना वाढीव ‘पेन्शन’देखील सुरू झाली. नागपूर ‘ईपीएफओ’कडे वाढीव ‘पेन्शन’साठी १ हजार ५९७ जणांनी अर्ज केले होते. यातील १६० जणांनाच वाढीव ‘पेन्शन’ सुरू करण्यात आली होती तर ४६१ अर्ज प्रलंबित आहेत. उर्वरित सर्व अर्ज नामंजूर करण्यात आले होते.४ जून २०१९ रोजी ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय कार्यालयाकडून एक पत्र आले. या पत्रानुसार वाढीव ‘पेन्शन’चा लाभ घेणाऱ्या ‘पेन्शनर्स’च्या कंपनी किंवा आस्थापनेने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. कुणालाही या ‘पेन्शन’चा अनवधानाने लाभ मिळू नये किंवा कुणी गैरप्रकाराने लाभ घेऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा कार्यालयाकडून करण्यात आला. मात्र हे पत्र आल्यानंतर नागपुरातील सुमारे १६० ‘पेन्शनर्स’ची मे महिन्यापासूनची ‘पेन्शन’ बंद करण्यात आली. अगोदर मिळत असलेली ‘पेन्शन’देखील त्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘पेन्शनर्स’मध्ये नाराजीचा सूर आहे.

कधीपर्यंत प्रतीक्षा करायची?‘ईपीएफओ’वर ‘पेन्शनर्स’चा विश्वास आहे व त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा केली होती. असे असतानादेखील ‘पेन्शन’ थांबविणे दुर्दैवी आहे. कागदपत्रांची परत पडताळणी कधी होईल व कधी परत ‘पेन्शन’ सुरू होईल हे कुणीही सांगत नाही. त्यामुळे ‘पेन्शनर्स’नी कधीपर्यंत प्रतीक्षा करायची असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी उपस्थित केला आहे. काही ‘पेन्शनर्स’ना ‘अरिअर्स’देखील देण्यात आले होते. आता त्यांची खातीच ‘होल्ड’वर ठेवण्यात आली आहे. सर्वांनी आता कधीपर्यंत प्रतीक्षा करायची ही बाब अनुत्तरितच आहे.

टॅग्स :Governmentसरकार