शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

मराठी साहित्य महामंडळाच्या प्रयत्नांमुळेच वाढले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:40 IST

शासन संमेलनासाठी जो २५ लाखांचा निधी देते त्यात मागच्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वस्तूत: आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम एक कोटी असायला हवी, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने या संपूर्ण पाठपुराव्याचा अभ्यास करून अनुदानाची ही रक्कम ५० लाख करण्याचा निर्णय घेतला व बडोदा संमेलनाच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली. हे वाढीव अनुदान पुढच्या वर्षीपासून दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे साहित्य महामंडळाने स्वागत केले असून हे अनुदान वाढविल्याबद्दल शासनाचे आभारही मानले आहेत.

ठळक मुद्देसातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश : मराठी साहित्य संमेलनाला मिळणार ५० लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या अनुदानात दुप्पटीने वाढ करीत पुढील वषार्पासून ते ५० लाख रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बडोदा येथे ९१ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात केली. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा मराठी साहित्य महामंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश आहे. राज्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, महागाईमुळे संमेलनासाठी २५ लाख पुरेसे नाही. त्यामुळे संमेलनाचे अनुदान वाढविण्यात यावे, असा प्रस्ताव महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारकडे पाठवला होता. परंतु त्यावर सुरुवातीला काहीच सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही. पण, म्हणून महामंडळाने आपले प्रयत्न सोडले नाहीत. या प्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा करणारा पत्रव्यवहार सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी केला गेला. शासन संमेलनासाठी जो २५ लाखांचा निधी देते त्यात मागच्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वस्तूत: आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम एक कोटी असायला हवी, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने या संपूर्ण पाठपुराव्याचा अभ्यास करून अनुदानाची ही रक्कम ५० लाख करण्याचा निर्णय घेतला व बडोदा संमेलनाच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली. हे वाढीव अनुदान पुढच्या वर्षीपासून दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे साहित्य महामंडळाने स्वागत केले असून हे अनुदान वाढविल्याबद्दल शासनाचे आभारही मानले आहेत.ही घोेषणा सांस्कृतिक परिवर्तनाची द्योतकसंमेलनाचे अनुदान वाढवून मिळावे, यासाठी विदर्भ साहित्य संघाने नेहमीच प्रयत्न केले. साहित्य महामंडळाचे कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे आल्यामुळे या मागणीला आणखी बळ मिळाले. हे निश्चितच महामंडळाच्या प्रयत्नाचे यश आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी जो मनाचा मोठेपणा दाखवला त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.डॉ. इंद्रजित ओरकेकार्यवाह, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळमराठी साहित्य संमेलनासाठी शासन मागच्या २५ वर्षांपासून २५ लाखांचा निधी देत होते. परंतु सध्याच्या बाजारभावानुसार ही रक्कम एक कोटी इतकी हवी. म्हणूनच महामंडळ मागच्या एक वर्षापासून सातत्याने ही मागणी करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बडोद्यात हे अनुदान ५० लाख करीत असल्याची घोषणा केली. या घोषणेचा आनंद आहेच व त्यासाठी मी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. परंतु संमेलनाचे स्वरूप बघता हा निधी अजूनही कमीच आहे. यात पुन्हा ५० लाखांची भर घातली जावी, अशी महामंडळाची अपेक्षा आहे.डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशीअध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळमराठी विद्यापीठाचा प्रश्नही मार्गी लागणारमराठी भाषेच्या संदर्भातील अनेक मागण्यांचा अनुशेष सरकारकडे कायम आहे. यात मराठी विद्यापीठाचाही समावेश आहे. ही मागणी तशी ८४ वर्षे जुनी आहे. आता कुठे शासन याबाबतीत सकारात्मक दिसत आहे. बडोदा साहित्य संमेलनाच्या मंचावर मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतही दिले आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे. यासोबतच मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत मुख्यमंत्र्यांच्या पुढकाराने साहित्यिकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, अशी माहिती डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य