शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या नावाने वाढविलेले विकास शुल्क रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पात मनपाचा ४३४ कोटी रुपयांचा वाटा देण्यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पात मनपाचा ४३४ कोटी रुपयांचा वाटा देण्यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नागपूर नियोजन प्राधिकरण क्षेत्रासाठी १०० टक्के विकास शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. गुरुवारी मनपाच्या सभेत एकमताने हा निर्णय रद्द करण्यात आला. यामुळे घराचे बांधकाम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आयुक्तांच्या निर्देशानुसार लागू करण्यात आलेला शुल्कवाढीचा निर्णय तर्कसंगत नसल्याचा मुद्दा ऑनलाईन सभेत सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला. यावर निर्णय देताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, ४३४ कोटीच्या मोबदल्यात मनपाने ५३ कोटी रुपये रोख व ९ स्टेशनसाठी करोडो रुपयांची जमीन व अन्य सेवा उपलब्ध केली आहे. याशिवाय स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून २६८ कोटी जमा झाले आहेत. अशा प्रकारे आजवर जवळपास ४०० कोटी रुपये व मालमत्ता मेट्रो रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आहे. स्टॅम्प ड्युटी वसुली अजूनही सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांवर सरसकट १०० टक्के विकास शुल्क वाढ लादणे योग्य नाही. ज्या मार्गावर मेट्रो कॉरिडोर बनविण्यात आली आहे. त्या जागेची किंमत गृहीत धरली तर एक हजार कोटीहून अधिक रकमेची जमीन मेट्रोला देण्यात आली आहे. याचा विचार करता विकास शुल्कवाढीचा निर्णय रद्द करणे योग्य होईल, अशी भूमिका सभागृहात मांडली. यावर चर्चा करून सर्व सदस्यांनी एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला.

शुल्क वाढ लादणे हा नागरिकांवर अन्याय

- अविनाश ठाकरे म्हणाले, मनपाने आपल्या वाट्याच्या निधीचा मोठा वाटा मेट्रोला दिला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा शुल्क वाढ लादणे हा शहरातील नागरिकांवर अन्याय होईल. विशेष म्हणजे शुल्क वाढीला आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केलेली नाही.

- माजी महापौर प्रवीण दटके म्हणाले, मेट्रो रेल्वेच्या नावावर सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा लादणे योग्य होणार नाही. हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनीही शुल्क वाढ अन्यायकारक असल्याची भूमिका मांडली.

...

जमीन मोफत द्यावयाची आहे : आयुक्त

मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी मनपाला जमीन मोफत उपलब्ध करावयाची आहे. मेट्रो स्टेशन, शेड व अन्य सुविधासाठी जमीन वापरात आणली जात असेल तर त्या जमिनीचे मूल्य आकारले जाईल. मनपाला या प्रकल्पात ३७७ काेटी रुपयांचा वाटा देणे शिल्लक आहे. टीओडी, शंभर टक्के विकास शुल्क, पीपीपी प्रकल्प, स्टॅम्प ड्युटी, जाहीराती अशा स्वरुपाचे पर्याय निधी उभारण्यासाठी सरकारने दिले आहेत. त्यानुसार विकास शुल्कात १०० टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.