शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:59 IST

राज्यासह नागपूर शहरात कोविडचे संकट नियंत्रणाबाहेर चालले आहे. शासकीय यंत्रणा व नागपूर महापालिका प्रशासन सद्यस्थिती हाताळण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ होत चालली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ठळक मुद्दे चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप : मनपा रुग्णालयांचा उपयोग काय ?

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यासह नागपूर शहरात कोविडचे संकट नियंत्रणाबाहेर चालले आहे. शासकीय यंत्रणा व नागपूर महापालिका प्रशासन सद्यस्थिती हाताळण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ होत चालली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.बावनकुळे म्हणाले, लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले पॉझिटिव्ह रुग्णाना वास्तविकता गृह-विलगीकरणात ठेवायला हवे असे दिशानिर्देश न्यायालयानेसुद्धा दिले आहेत. कोविड रुग्णालयांनी तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची देखभाल करणे अपेक्षित असताना नागपूर महापालिका आपल्या संसाधनांवर अनावश्यकरीत्या ताण देऊन लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात भरती करून जनतेच्या पैशांचा अपव्यय करीत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांचे नविनीकरण व कोविड तयारीबाबत प्रसार माध्यमांतून बरीच प्रसिद्धी केली. पुढे काय झाले हे कुणालाच माहीत नाही. या रुग्णालयात कोविडचे रुग्ण का म्हणून दाखल करून घेण्यात येत नाहीत, या रुग्णालयांच्या पुनर्विकासावर किती रक्कम खर्च करण्यात आली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. काटोल रोडवर राधास्वामी सत्संगच्या जागेत पाच हजार खाटा तयार करण्यात आल्या होत्या. त्याचीही बरीच प्रसिद्धी करण्यात आली. जेव्हा या सुविधांचा वापरच करण्यात आला नाही तर जनतेच्या पैशांचा झालेल्या अपव्ययाला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला.रहिवासी क्षेत्रातील खासगी रुग्णालये ही फक्त कोविड व्यतिरिक्त आजाराच्या रुग्णांसाठी राखीव ठेवावीत. एखाद्या खासगी रुग्णालयाचा भाग जरी कोविड रुग्णालय म्हणून वापरला तर इतर रुग्ण भीतीपोटी त्या रुग्णालयाच्या नॉन-कोविड भागात जाणारसुद्धा नाहीत. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णामुळे जर कोविड रहिवासी क्षेत्रात पसरला तर पुढे उत्पन्न होणाऱ्या विपत्तीला जबाबदार कोण राहणार? असले विसंगत निर्णय कोण घेत आहे, असे प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेcorona virusकोरोना वायरस बातम्या