नागपूर : उत्तर प्रदेश आणि बिहारकडील रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली असून एका कोचमध्ये १२० प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक नागरिक इतर राज्यात कामासाठी गेलेले आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्यामुळे हे नागरिक आपापल्या गावाकडे परत जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यात गर्दी वाढली आहे. एका कोचमध्ये ७२ प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असते. परंतु या राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यात एका कोचमध्ये १२० प्रवासी प्रवास करीत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा होणार नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या बाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता. त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
सोमवारी गेला एकाचा जीव
सोमवारी एर्नाकुलम पटना एक्स्प्रेसमध्ये एस ८ कोच मध्ये ११० प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे एका प्रवाशांचा गुदमरून जीव गेला होता. तरीसुद्धा रेल्वे प्रशासन काहीच उपाययोजना करीत नसल्याचे चित्र आहे.
.....