शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus; ५० मधून १० मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 10:44 IST

Nagpur News १२ ते १८ वयोगटातील ५० मधून १० मुलांच्या शरीरात प्रतिपिंडाची (अ‍ॅण्टिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे. यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलहान मुलांवरील मानवी चाचणीत उघडसिरो सर्वेक्षणात ४९ टक्के लोकांना नकळत कोरोना होऊन गेला

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज विकसित कशी होईल, यासंदर्भात विविध पातळ्यांवर संशोधन सुरू असून लसीकरणाच्या चाचणीलादेखील सुुरुवात झाली आहे. सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत असताना नागपूर शहरातील पालकांसाठी एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. १२ ते १८ वयोगटातील ५० मधून १० मुलांच्या शरीरात प्रतिपिंडाची (अ‍ॅण्टिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे. लसीकरणाअगोदरच २० टक्के मुलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याने यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लहान मुलांवरील लसीकरणासाठी राज्यात पहिल्यांदाच नागपुरात बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या पुढाकारात २ ते १८ या वयोगटात कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला ६ जूनपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील चाचणीसाठी ५० सुदृढ मुलांची निवड करण्यात आली. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता, १० मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून आले. यामुळे डॉक्टरांच्या पथकालाही आश्चर्य वाटले. प्राप्त माहितीनुसार, निवड झालेली मुले सुखवस्तू घरातील आहेत. त्यांच्या घरातील जवळच्या व्यक्तीला संसर्ग झालेला नाही. शिवाय, मागील दोन महिन्यांत मुलांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यानंतरही त्यांच्या शरीरात अ‍ॅण्टिबॉडीज वाढल्या आहेत.

- झोपडपट्टीतील लोकांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज

विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या पुढाकाराने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘पीएसएम’ विभागाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० मध्ये सिरो सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील ४९.७ टक्के, तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अ‍ॅण्टिबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले होते. विशेषत: झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये ॲण्टिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व पॉश वसाहतीत राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट होते.

- मुलांमध्ये वाढलेल्या अ‍ॅण्टिबॉडीजचा अभ्यास होणे महत्त्वाचे

लहान मुलांवरील मानवी चाचणीत ५० मधून १० मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून आले आहे. ही एक मोठी संख्या आहे. यामुळे याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. यांना त्यांच्या नातेवाइकांकडून, किंवा इतर मुलांकडून लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. लहान मुलांमधील रोगप्रतिकारकशक्ती मोठ्यांच्या तुलनेत अधिक प्रबळ असते. यामुळे कोरोनाची मध्यम व गंभीर लक्षणे फार कमी प्रमाणात दिसून येतात.

-डॉ. वसंत खळतकर, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस