शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहांची क्षमता वाढवा ; महाविद्यालयांच्या जवळच बांधा

By आनंद डेकाटे | Updated: June 28, 2025 18:01 IST

Nagpur : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वसतिगृहांची क्षमता वाढवून ती किमान १५० ते जास्तीत जास्त १००० विद्यार्थ्यांपर्यंत करावी, अशा स्पष्ट सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. “बहुतेक वसतिगृहे १०० क्षमतेच्या मर्यादित स्वरूपातील असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे नवीन वसतिगृहं मोठ्या क्षमतेची आणि महाविद्यालयांच्या जवळच बांधा,” असेही त्यांनी सांगितले.

शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागपूर विभागातील सर्व उपायुक्त, संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

बैठकीत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेचा वेग वाढवण्यावर भर देण्यात आला. “विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रक्रिया गतीमान करा आणि नागरिकांमध्ये विभागाच्या कार्याची सकारात्मक छबी निर्माण होईल असे काम करा,” असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, तसेच विविध जिल्ह्यांचे उपायुक्त, सहायक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण अधिकारी व संशाेधन अधिकारी उपस्थित होते. 

महाविद्यालयांनी शुक्त आकारल्यास कारवाई होणारया वेळी उपस्थित प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांनी महाविद्यालयांना स्पष्ट इशारा दिला की, अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतल्यास संबंधित संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. 

मुख्य मुद्दे :- नवीन वसतिगृहे १५० ते १००० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची उभारावीत- वसतिगृहे महाविद्यालयांच्या जवळ असावीत- जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश- एसी/एसटी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्यास कारवाई होणार

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालयnagpurनागपूर