शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ : नितीन बरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:24 IST

ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. सध्या थंडीचा कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकोरडेपणा, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदींचे रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. सध्या थंडीचा कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्वचा कोरडी पडणे, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदी समस्या घेऊन रुग्ण येत आहेत. हिवाळ्यात जर निरोगी, सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असा सल्ला प्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी दिला.उन्हाळ्यात त्वचा घामाला नियमितपणे शरीराबाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या तक्रारी उद्भवत नाहीत. घामामुळे त्वचेची रंध्रे उघडी राहतात. विशेषत: आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो. त्यांचा तेलकटपणा रंध्रातून बाहेर पडतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. परंतु, हिवाळ्यात त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया मंदावते किंवा बंद होत जाते. त्यामुळे त्वचेचे विकार वाढत असल्याचे डॉ. बरडे यांचे म्हणणे आहे.त्वचा ‘ड्राय’ होणार नाही याची काळजी घ्याडॉ. बरडे म्हणाले, बदलत्या वातावरणामुळे अनेकवेळा थंडी जाणवत नाही. परंतु थंडीमुळे त्वचा ‘ड्राय’ होते. पर्यायी बरेचसे त्वचेचे आजार होण्याचा धोका असतो. म्हणून साबणाचा वापर केल्यानंतर लगेच त्वचेवर मोश्चरायजर लावायला हवे. अंघोळीनंतर त्वचेला टॉवेलने रगडू नये. साबणाऐवजी ‘क्लिंजर’ वापरावा. ‘स्क्रब’ क्रिमचा वापर टाळावा. ‘हिटर’मुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे याबाबत अधिक काळजी घ्यावी.हिवाळ्यातही सनस्क्रीनचा वापर कराहिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, म्हणून सनस्क्रीन लावले नाही तरी चालते, असा अनेकांचा समज असतो. परंतु हे चुकीचे आहे. उलट हिवाळ्यामध्ये अतिनील किरणे जास्त प्रमाणात सक्रिय असतात. यामुळे सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्लाही डॉ. बरडे यांनी दिला.गजकर्ण व सोरायसिस विकाराची विशेष काळजी घ्यावीज्यांना आधिपासून गजकर्ण व सोरायसिस आजार आहेत, त्यांना हिवाळ्यात अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांनी आधीपासूनच नियमित त्वचेला मोश्चरायजर लावावे, सोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते. याकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार उफाळून येत असल्याचेही डॉ. बरडे म्हणाले.‘अ‍ॅलर्जी’कडे दुर्लक्ष नकोहिवाळ्यातील उन्हामुळे ‘अ‍ॅलर्जी’ निर्माण होऊ शकते. यात उन्ह लागणाऱ्या शरीराच्या भागावर लाल पुरळ येऊन खाज सुटते, अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यायला हवे. शिवाय, उलन किंवा इतर उबदार कपडे वापरताना आत सुतीचे कपडे घालणे आवश्यक असते.ओठांची विशेष काळजी घ्याहिवाळ्यात ओठांचा ओलसरपणा टिकून ठेवणे आवश्यक आहे. ओठाची त्वचा खूप नाजूक असल्याने त्यावर हवा आणि थंड वातावरणाचा थेट प्रभाव पडतो. यामुळे वारंवार ओठांना जीभ लावू नये.ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठ फूटण्यापूर्वी व्हॅसलिन किंवा ‘लिप बाम’चा वापर नियमित करायला हवा, असेही डॉ. बरडे म्हणाले.भरपूर पाणी प्याहिवाळ्यात आहाराकडेही योग्य लक्ष द्यायला हवे. आहारात स्निग्ध पदार्थ, भरपूर ताजी फळे, शहाळाचे पाणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचा समावेश करायला हवा असे सांगत डॉ. बरडे म्हणाले, थंडीमुळे अनेक जण पाणी कमी पितात. याचा परिणाम आरोग्यावर होता. यामुळे ऋतु कुठलाही असो त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यायला हवे.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीdoctorडॉक्टर