शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

नागपुरात ‘पासपोर्ट’च्या मागणीत वाढ : तीन वर्षात साडेतीन लाखांहून अधिक अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:59 IST

उपराजधानीतील नागरिकांमध्ये ‘पासपोर्ट’ काढण्यासंदर्भात जागरुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘पासपोर्ट’साठी साडेतीन लाखांहून अधिक अर्ज आले तर ‘पासपोर्ट’साठी असलेल्या निर्धारित शुल्कातून सुमारे ५२ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.

ठळक मुद्दे‘पासपोर्ट’ शुल्कातून ५२ कोटींचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील नागरिकांमध्ये ‘पासपोर्ट’ काढण्यासंदर्भात जागरुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘पासपोर्ट’साठी साडेतीन लाखांहून अधिक अर्ज आले तर ‘पासपोर्ट’साठी असलेल्या निर्धारित शुल्कातून सुमारे ५२ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर येथील ‘पासपोर्ट’ कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. १ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘पासपोर्ट’साठी आलेले अर्ज, प्रत्यक्ष जारी करण्यात आलेले ‘पासपोर्ट’, शुल्कातून प्राप्त झालेला महसूल इत्यादींबाबत विचारणा केली होती. यासंदर्भात ‘पासपोर्ट’ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१६ ते २०१८ या कालावधीत ३ लाख ५६ हजार ८२ लोकांनी ‘पासपोर्ट’साठी अर्ज केले. या तीन वर्षांतील व अगोदरचे प्रलंबित अर्ज असे मिळून या काळात ३ लाख ६२ हजार १३३ ‘पासपोर्ट’ जारी करण्यात आले. विविध कारणांमुळे केवळ दोन अर्ज रद्द करण्यात आले.तीन वर्षांत २ हजार ९२६ ‘पासपोर्ट’ दिलेल्या पत्त्यावर पोहोचू शकले नाहीत तर ८२ हजार १९१ ‘पासपोर्ट’ निलंबित करण्यात आले. ‘पासपोर्ट’ शुल्कातून ५२ कोटी ९० लाख १० हजार ७९० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.२०१३ मध्ये आले होते ८१ हजार अर्ज२०१३ पासून अर्ज व प्रत्यक्ष जारी झालेले ‘पासपोर्ट’ यांच्या संख्येतदेखील सातत्याने वाढ होत आहे. २०१३ मध्ये ८१ हजार ४७१ अर्ज प्राप्त झाले होते व ७५ हजार ५७१ ‘पासपोर्ट’ जारी झाले होते. २०१४ मध्ये ९९ हजार २३७ अर्ज प्राप्त झाले व ९१ हजार ५०८ ‘पासपोर्ट’ जारी झाले. २०१५ मध्ये १ लाख १४ हजार ६४० अर्ज आले व १ लाख १४ हजार ९४९ अर्जदारांचे ‘पासपोर्ट’ जारी झाले होते.वर्षनिहाय ‘पासपोर्ट’ची आकडेवारीवर्ष             प्राप्त अर्ज                जारी२०१३         ८१,४७१               ७५,५७१२०१४        ९९,२३७              ९१,५०८२०१५        १,१४,६४०           १,१४,९४९२०१६        १,१८,१२४            १,२०,१४०२०१७       १,२०,३४९             १,२२,३६६२०१८        १,१७,६०९             १,१९,६२७एका दिवसात जारी होतो तत्काल ‘पासपोर्ट’‘पासपोर्ट’संबंधात सर्व प्रक्रिया झाल्यानंतर २०१८ साली सर्वसाधारण ‘पासपोर्ट’ ६.३८ दिवसांत जारी झाले. २०१६ मध्ये हाच आकडा ३.०९ इतका होता. तर २०१५ मध्ये सरासरी ४.१५ दिवस लागले होते. २०१८ मध्ये तत्काल ‘पासपोर्ट’ जारी व्हायला सरासरी १.०८ दिवस लागले. २०१६ मध्ये १.८९ तर २०१७ मध्ये १.०३ दिवस लागले होते.

टॅग्स :passportपासपोर्टRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता