शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यावर भर

By admin | Updated: September 27, 2015 02:48 IST

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री : पाटबंधारे विभागाची सर्वसाधारण सभानागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.वैनगंगानगर येथील पाटबंधारे वसाहतीत आयोजित २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख होते. अभियंता संजय खोंडे अध्यक्षस्थानी होते. मान्सूनच्या पावसाची अनियमितता पाहता राज्यात जास्तीतजास्त पाणी अडविण्यावरा सरकारचा भर आहे. शेतकऱ्यांसाठी रब्बी सिंचनाचे क्षेत्र कमी होऊ देणार नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सिंचनाचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांनी याबाबत बैठक घ्यावी. विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था ही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आज अग्रेसर आहे. तसेच या पतसंस्थेतील कर्मचारी, अधिकारी आणि भागभांडवलदारांच्या अडीअडचणींकरिता या पतसंस्थेद्वारे नेहमी मदत केली जाते. ही कौतुकास्पद बाब आहे. प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या योजना उल्लेखनीय असून सर्वांच्या प्रयत्नाने ही संस्था शिखरावर पोहोचली आहे, असे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. यावेळी गुणवंत विद्यार्थी तेजेश माणिकपुरे या विद्यार्थ्याचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर महल्ले, कार्यकारी अभियंता संजय वानखेडे, विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे, अधीक्षक अभियंता र. क्रु. ढवळे यांच्यासह पतसंस्थेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)साहाय्यता निधीसाठी ५१ हजारांचा धनादेश पाटबंधारे विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीकरिता ५१ हजारांचा धनादेश आणि एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.