शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

काँक्रिट डेव्हलपर्सवर आयकर धाडी

By admin | Updated: December 2, 2015 03:01 IST

कर चुकवेगिरी करणाऱ्या मोठ्या समूहावर आयकर विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. त्याअंतर्गत बिल्डर्स आणि डेव्हलपर्स क्षेत्रातील ...

बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे जप्त : बँकांमधील खाते गोठवलेनागपूर : कर चुकवेगिरी करणाऱ्या मोठ्या समूहावर आयकर विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. त्याअंतर्गत बिल्डर्स आणि डेव्हलपर्स क्षेत्रातील आघाडीच्या काँक्रिट डेव्हलपर्सची कार्यालये आणि निवासस्थानावर आयकर विभागाने मंगळवारी धाडी टाकून कोट्यवधींच्या अवैध संपत्तीची कागदपत्रे जप्त केली असून, बँकेतील खाते गोठवल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. संजय एन. पैडलवार आणि नीलेश रामचंद्र चोरडिया अशी कंपनीच्या व्यवस्थापकीय भागीदारांची नावे आहेत. काँक्रिट समूहाची काँक्रिट डेव्हलपर्स आणि काँक्रिट बिल्डकॉन प्रा.लि.अशी दोन फर्म आहेत. समूहाची कार्यालये रामदासपेठ, कॅनॉल रोड आणि गांधीनगर येथे आहे. आयकर अधिकाऱ्यांनी कार्यालये आणि निवासस्थानावर धाडी टाकल्याची माहिती आहे. विभागाने एकूण सात ठिकाणांपैकी तीन ठिकाणी धाडी तर चार ठिकाणी तपासणीची कारवाई केली. त्यात संजय पैडलवार आणि नीलेश चोरडिया यांच्या रामदासपेठेतील निवासस्थानांचा समावेश आहे. या कारवाईत ५० अधिकारी सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीदरम्यान जमीन खरेदी आणि बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. याशिवाय काँक्रिट समूहाचे नोंदणीकृत सौदे आणि ग्राहकांकडून घेतलेली ४० टक्के रकमेची कागदपत्रे अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. ग्राहकांकडून घेतलेल्या रकमेची खात्यात नोंदणी केली नसल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. याशिवाय रोख आणि दागिनेसुद्धा अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती आहे. हा समूह १९९४ पासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. लक्झरीयस अपार्टमेंट, निवासी व व्यावसायिक प्रकल्प आणि हॉटेलचे बांधकाम करते. समूहाने नागपुरातील मोक्याच्या ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या काही भागात ७० प्रकल्प पूर्ण केले आहेत. याशिवाय नागपूर आणि अन्य शहरात रिटेल शॉपिंग सेंटर्स, आॅफिस बिल्डिंंग, इंडस्ट्रीयल बिल्डिंग, अपार्टमेंट प्रकल्प, निवासी फ्लॅट योजना उभारल्या असून जमीन विकासक म्हणून समूह कार्य करते. काही प्रकल्पात ७० टक्के तर काही प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. आयकर खात्याची धाडीची कारवाई बुधवारीही सुरू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)