शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विविध भागांत मारहाणीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील वेगवेगळ्या भागांत किरकोळ कारणावरून हल्ला चढवून मारहाण केल्याच्या पाच घटना घडल्या. एमआयडीसी, सदर, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील वेगवेगळ्या भागांत किरकोळ कारणावरून हल्ला चढवून मारहाण केल्याच्या पाच घटना घडल्या. एमआयडीसी, सदर, सोनेगाव आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनांची संबंधित पोलिसांनी नोंद घेत गुन्हे दाखल केले आहेत.

एमआयडीसीच्या रॉय टाऊनमध्ये फिर्यादी अमन धानधराटे (वय ३३) राहतात. ते सॉफ्टवेअर डिझायनर आहेत. याच भागात ऑटोचालक आरोपी स्वप्निल वालदे राहतो. तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे. २७ ऑगस्टला रात्री ८.३० वाजता त्याने सोसायटीच्या थेट रस्त्यामध्ये आपला ऑटो उभा केला. त्यावरून अमनने त्याला जाब विचारला असता आरोपी स्वप्निल त्याची पत्नी, प्रफुल्ल, विपुल आणि त्यांचे साथीदार अमनच्या घरावर चालून आले. त्यांनी अमनला मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. तसेच अमनचा लॅपटॉप फेकून जीवे मारण्याची धमकी दिली.

एमआयडीसीतच दुसरी घटना २९ ऑगस्टच्या रात्री १०.३० वाजता घडली. गोविंद यादव (वय ५८) यांना आणि त्यांच्या पत्नीला आरोपी जितेंद्र यादव, कलावती यादव, अमित आणि संदीप यादव यांनी बेदम मारहाण केली. गोविंद यांचा मुलगा बचावासाठी आला असता त्याला आरोपींनी कडाडून चावा घेतला.

---

सदर

घरमालकासोबत वाद झाल्यानंतर आरोपी जय कनोजिया, वीरू कनोजिया आणि साथीदारांनी अनुज राजेंद्रकुमार सिडाम (वय२९, रा. बैरामजी टाऊन) यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला करून त्यांना जबर दुखापत केली. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली.

---

सोनेगाव

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे हर्षल सुधाकर हिवाळे (वय २७) यांना आरोपी सागर वामन गजभिये आणि त्याच्या आईने सोमवारी रात्री ८.२० वाजता वाद घातला. बाचाबाचीनंतर सागरने हर्षलवर हॉकी स्टीकने हल्ला करून त्यांना जबर दुखापत केली.

---

कपिलनगर

अशाच प्रकारे सोमवारी रात्री ७.३० च्या सुमारास उप्पलवाडीतील एका कारखान्यात काम करणारे धर्मवीर रामवीर यादव (वय २०) याच्यावर दुर्गेश जाधव, दिनेश यादव, नईम प्रजापती, अन्सार आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला चढवून बेदम मारहाण केली. आरोपींनी धर्मवीरच्या स्विफ्ट कारचीही तोडफोड केली.