शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

नागपूरच्या आपली बसमधील कारनामा : निलंबित कंडक्टर देतोय तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:51 IST

कंडक्टरची कमतरता असल्यामुळे बऱ्याचवेळा आपली बसची चाके थांबली. मात्र, सोमवारी एक अशी घटना समोर आली की एका बसमध्ये दोन कंडक्टर तिकीट देताना आढळले. तपासणीत लक्षात आले की संबंधित दुसरा कंडक्टर निलंबित आहे. असे असतानाही तो प्रवाशांना तिकीट देत होता. एवढेच नव्हे तर मनाई असतानाही कंडक्टर मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले. विविध कंडक्टरकडून असे आठ मोबाईल जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देभरारी पथकाच्या पाहणीत उघड : कंडक्टरकडून आठ मोबाईल जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कंडक्टरची कमतरता असल्यामुळे बऱ्याचवेळा आपली बसची चाके थांबली. मात्र, सोमवारी एक अशी घटना समोर आली की एका बसमध्ये दोन कंडक्टर तिकीट देताना आढळले. तपासणीत लक्षात आले की संबंधित दुसरा कंडक्टर निलंबित आहे. असे असतानाही तो प्रवाशांना तिकीट देत होता. एवढेच नव्हे तर मनाई असतानाही कंडक्टर मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले. विविध कंडक्टरकडून असे आठ मोबाईल जप्त करण्यात आले.महापालिकेच्या परिवहन समितीच्या दिशानिर्देशानुसार बसच्या आकस्मिक तपासणीसाठी पथक नेमण्यात आले आहेत. गेल्यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या पथकाने धडक कारवाई केली. त्यावेळी आपली बसला आर्थिक फटका देणाºया कंडक्टरचा भंडाफोडही झाला होता. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून तिकिटांचे पैसे हडप करण्याचे प्रकारही समोर आले होते. हा गोरखधंदा अजूनही सुरूच आहे. याची माहिती असल्यामुळे पथक पुन्हा सक्रिय झाले. पथकाने सोमवारी काही मार्गांवरील बसची आकस्मिक तपासणी केली. यावेळी बस क्रमांक एमएच ३१ सीए ०३८८ मध्ये दोन कंडक्टर असल्याचे दिसून आले. ड्युटीवर असेलेले फूद्दन मोहोड व निलंबित (आईडी लॉक) करण्यात आलेले नंदकिशोर खंगार यांचा यात समावेश होता. खंगार हे प्रवाशांना तिकीट देत होते. त्याचप्रकारे बर्डी-कामठी मार्गावर बस क्रमांक एमएच ३१ सीए ०४१४ मध्येही निलंबित कंडक्टर प्रेम सहानी हे प्रवाशांना तिकीट देत असल्याचे आढळून आले. त्यांच्यासोबत ड्युटीवर असलेले कंडक्टर संदीप पहाडे देखील होते. याची गंभीर दखल घेण्यात आली.बसमध्ये कंडक्टरला मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही बर्डी, शांतीनगर, कामठी, पिपळा फाटा, पारडी, कळमेश्वर मार्गावरील बसमध्ये कंडक्टरजवळ मोबाईल असल्याचे आढळून आले. असे एकूण आठ मोबाईल जप्त करण्यात आले. कंडक्टरजवळ मोबाईल आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारून मोबाईल परत दिला जातो. या कारवाईमुळे कंडक्टरचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक