शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मास्टर स्टेशनचे आज उद्घाटन

By admin | Updated: August 7, 2016 02:24 IST

९१.९ एफएम रेडिओ आॅरेंजच्या सर्व सुविधांनी सुसज्ज मास्टर स्टेशनचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात होणार आहे.

रेडिओ आॅरेंजचे प्रसारण : अकोला व बिलासपूर येथे प्रसारण नागपूर : ९१.९ एफएम रेडिओ आॅरेंजच्या सर्व सुविधांनी सुसज्ज मास्टर स्टेशनचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसकर आणि जयंती मजुमदार उपस्थित राहतील. रविवारी ५.३० वाजेपासून अकोला आणि बिलासपूर येथे प्रसारण सुरू होणार आहे. अभिजित मजुमदार चॅनलचे प्रशासकीय संचालक आहेत. विदर्भातून मीडिया क्षेत्रात पदार्पण करणारे पहिले व्यावसायिक आहेत. इनु मजुमदार चॅलनचे सीईओ आहेत. समूह पुढील पाच वर्षांत ५० शहरात प्रसारण करणार आहे. रेडिओ स्टेशन मध्य भारतातील सर्वात मोठे असणार आहे. ‘कुछ खट्टा कुछ मिठा’ हे चॅनलचे घोषवाक्य आहे. चॅनल कार्यक्रमांना प्रादेशिक तडका राहणार असून महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील लोकांना निश्चितच आवडणार आहे. चॅनलवर भारतातील पहिले दिव्यांग रेडिओ जॉकी आर.जे. शाहनवाज ‘रात बाकी बात बाकी’ शो सादर करणार आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांना आवडेल असे चॅनलचे शो राहतील. चमूमध्ये १० ते १२ वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ राहतील. काही महिन्यांपूर्वी चॅनलने अकोला, बिलासपूर आणि नागपुरात एक क्रिएटिव्ह आणि तांत्रिक विभागांमध्ये भरतीसाठी मोहीम चालविली होती. १५०० पेक्षा जास्त उमेदवारांनी या मोहिमेत भाग घेतला. रेडिओ जॉकीच्या पदासाठी १२ आरजेची निवड करण्यात आली. सर्व आरजे फ्रेशर आहेत आणि श्रोत्यांना त्यांच्या फ्रेश आवाजाला अनुभवण्याची नवीन संधी मिळणार आहे. चॅनलला प्रायोजकांकडून प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल मीडियावर राबविलेल्या मोहिमेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चॅनलचे कार्पोरेट कार्यालय जयंतीनगरी, पूर्ती बाजारावर बेसा रोड, मनीषनगर येथे आहे. (वा.प्र.)