शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती सुधारतेय  : कोरोना संशयितांचे १६ नमुने दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:30 PM

कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आलेले चारही रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. मेयोत भरती असलेल्या यातील एका रुग्णाच्या नमुन्याची दोनदा चाचणी करण्यात आली.

ठळक मुद्देचाचणी निगेटिव्ह आल्यावरच बाधित रुग्णांना सुटी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आलेले चारही रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. मेयोत भरती असलेल्या यातील एका रुग्णाच्या नमुन्याची दोनदा चाचणी करण्यात आली. दोन्हीवेळा निगेटिव्ह आले तर मेडिकलमधील रुग्णांचे नमुने शुक्रवारी घेण्यात आले. लवकरच तपासणी केली जाणार आहे. मात्र, या चारही रुग्णांना भरती झाल्यापासून १४ दिवस रुग्णालयातच रहावे लागणार आहे. त्यानंतर दोन चाचणीत त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यावरच घरी पाठविले जाईल. मेयोच्या प्रयोगशाळेला आज १६ नमुने प्राप्त झाले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर व आरोग्य यंत्रणेकडून युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तपासणीखाली आणले जात आहे. बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. यात लक्षणे आढळून येणाऱ्यांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले जात आहे. ज्यांना लक्षणे नाहीत, ६० वर्षांखालील आहेत आणि जे नागपूरवासी आहेत त्यांना ‘कॉरन्टाईन’ कक्षातून सुटी दिली जात आहे. घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या शिवाय, जे संशयित रुग्ण आहेत आणि घरी आहेत त्यांना दिवसा व रात्री फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात आहे. यात कुणाला लक्षणे दिसल्यास त्यांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले जात आहे. या स्वरुपात शासनाचे काम सुरू आहे. बहुसंख्य नागरिकही प्रतिबंधात्मक उपचार करीत आहे. यातच कोरोना विषाणूची लागण झालेल्या चारही रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. यामुळे नागपुरात एक सकारात्मक चित्र निर्माण होऊ लागले आहे.शुक्रवारी मेयोमध्ये कोरोनाचे तीन तर मेडिकलमध्ये एक संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. आज पहिल्या टप्प्यात केलेल्या पाच संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात १६ नमुने तपासणीसाठी आले असून रात्री उशिरापर्यंत याचा अहवाल येण्याची शक्यता आहे.अमरावतील सहा तर गोंदियातील दोन नमुनेमेयोच्या प्रयोगशाळेला आज १६ नमुने प्राप्त झाले. यात मेयोतील सहा, अकोल्यातील एक, भंडाºयातील एक, अमरावतीतील सहा तर गोंदियातील दोन नमुन्यांचा समावेश आहे.१४ प्रवाशांची विलगीकरण कक्षात रवानगीडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या १४ प्रवाशांच्या तपासणीनंतर सर्वांनाच आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. यातील एका प्रवाशाला लक्षण आढळून आल्याने मेयोमध्ये पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल