शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

‘टॉन्टिंग’ करणाऱ्याला कारावास

By admin | Updated: September 1, 2016 02:56 IST

शेजाऱ्याला बडग्या-मारबतच्या नावे ‘टॉन्टिंग’ (टोमणे) करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एका हेड कॉन्स्टेबलला

नागपूर : शेजाऱ्याला बडग्या-मारबतच्या नावे ‘टॉन्टिंग’ (टोमणे) करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एका हेड कॉन्स्टेबलला बाराव्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.सी. राऊत यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भागवत तुकाराम भेंडारकर (५३), असे आरोपी हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो पिपला फाटा भागातील साईविहार कॉलनी येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो लकडगंज पोलीस ठाण्यात तैनात होता. ज्ञानेश्वर चुटे, असे मृताचे नाव होते. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मृत ज्ञानेश्वर चुटे आणि हेड कॉन्स्टेबल भागवत भेंडारकर हे एकमेकांचे शेजारी होते. चुटे हे महावितरणचे निवृत्त कर्मचारी होते. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता. या दोघांनी आपापल्या परीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. ही बाब आरोपी हेड कॉन्स्टेबलला समजताच त्याने चुटे यांना पाहून ‘बडग्या मारबत गेले, नाक कापून गेले’असे टोमणे मारणे सुरू केले होते. १४ एप्रिल २०१४ रोजी चुटे यांनी भेंडारकर याला गाठून तू का टॉन्टिंग करतो, अशी विचारणा करताच भेंडारकर याने चुटे यांच्याशी भांडण करून त्याला मारहाण केली होती. वसाहतीतील लोकांनी भांडण सोडवले होते. खुद्द ज्ञानेश्वर चुटे आणि त्यांची पत्नी विजया चुटे यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून चुटे यांना न्यायालयात दाद मागण्याची समज दिली होती. या प्रकारामुळे मानसिक परिणाम होऊन चुटे यांनी आपल्या खोलीत स्वत:ला बंद करून छताला नायलॉन दोरीने बांधून आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली होती. भेंडारकरकडून होणाऱ्या छळाची कर्मकहाणी त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली होती. विजया चुटे यांच्या तक्रारीवरून भेंडारकरविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी भादंविच्या ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयातून त्याने अटकपूर्व जामीन प्राप्त केला होता.सबळ साक्षीपुराव्यांवरून गुन्हा सिद्ध‘टॉन्टिंग’ करणाऱ्याला कारावास नागपूर : या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक ए.जे. शेख आणि अमोल इंगोले यांनी केला होता. न्यायालयात सबळ साक्षीपुराव्यांवरून गुन्हा सिद्ध होऊन या आरोपी हेड कॉन्स्टेबलला न्यायालयाने शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील प्रशांत साखरे, वर्षा आगलावे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल रवींद्र आग्रे आणि रवींद्र धरपाल यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)