शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन अट्टल घरफोड्यांना कारावास

By admin | Updated: March 19, 2017 02:59 IST

घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणात शनिवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आय. लोकवानी यांच्या न्यायालयाने

न्यायालय : मानकापूर भागातील तीन वेगवेगळ््या खटल्यांचा निकाल नागपूर : घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणात शनिवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आय. लोकवानी यांच्या न्यायालयाने तीन अट्टल घरफोड्यांना एक वर्ष सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये दंड सुनावला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे हे तिन्ही खटले वेगवेगळे चालून वेगवेगळ्या तीन आदेशान्वये आरोपींना ही शिक्षा सुनावण्यात आली. बबलू अंबादास दांडेकर (१९), व्यंकटी ऊर्फ बंटी मारोती दांडेकर आणि सूरज जयराम जाधव (१९), अशी आरोपींची नावे असून ते कोराडी मार्गावरील वॉक्स कूलरमागील श्रीकृष्णधाम झोपडपट्टी येथील रहिवासी आहेत. पहिली घटना २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान गायत्रीनगर सचिन सोसायटी येथील कोमल राजेश दुबे यांच्याकडे घडली होती.चोरट्यांनी संधी साधून मुख्य दाराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, २५०० रुपये रोख, असा एकूण १ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. तपासा दरम्यान शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक के. डी. भगत यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने तिन्ही आरोपींना भादंविच्या ४५४ कलमांतर्गत एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, कलम ४५७ अंतर्गत एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि कलम ३८०, ३४ अंतर्गत एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. घरफोडीची दुसरी घटना ८ आॅक्टोबर २०१५ रोजी व्यंकटेश एन्क्लेव्ह येथे यश अश्विनकुमार नायडू यांच्याकडे घडली होती. यश नायडू हे इंडस इंड बँकेत व्यवस्थापक आहेत. चोरट्यांनी मुख्य दाराचा कुलूप कोंडा तोडून २५ हजार ७०० रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही चोरट्यांना अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक एल. के. हांडे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ४५४ अंतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि भादंविच्या ३८०, ३४ कलमांतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. घरफोडीची तिसरी घटना १५ जानेवारी २०१६ रोजी गोधनी रोडवरील एमबी टाऊन येथील अर्पण तुषारकांत कटकवार यांच्याकडे घडली होती.चोरट्यांनी मुख्य दाराचा कुलूप कोंडा तोडून रोख २४ हजार, सोने चांदीचे दागिने असा एकूण ७० हजाराचा ऐवज लंपास केला होता. गुन्हे शाखा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून ६१ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. हेड कॉन्स्टेबल बट्टूलाल पांडे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन आरोपींना भादंविच्या कलम ४५४ अंतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि भादंविच्या ३८०, ३४ कलमांतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील रत्ना घाटे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल रवींद्र वैद्य, नायक कॉन्स्टेबल जीवनलाल गुप्ता यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)