शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

सायबर गुन्ह्यात कारावास

By admin | Updated: June 10, 2016 02:55 IST

खासगी दंत महाविद्यालयात बीडीएसच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीची अश्लील व्हिडिओ क्लिप फेसबुकवर अपलोड करून...

विद्यार्थिनीची अश्लील व्हिडिओ क्लिप फेसबुकवर केली होती अपलोड नागपूर : खासगी दंत महाविद्यालयात बीडीएसच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीची अश्लील व्हिडिओ क्लिप फेसबुकवर अपलोड करून प्रसारण करणाऱ्या एका आरोपीला दुसरे तदर्थ न्यायालयाचे सहायक सत्र न्यायाधीश जी.पी. शिरसाट यांच्या न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षे सश्रम कारावास आणि १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सायबर गुन्ह्यात अलीकडच्या काळात नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली ही पहिलीच शिक्षा होय. पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकरणात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाने एका प्राध्यापकाला शिक्षा सुनावली होती. अजय शलिकराम गजभिये (४०) असे आरोपीचे नाव असून, तो अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंजीलालपेठ येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, अजय हा अजंठा फार्मास्युटिकल नावाच्या औषध कंपनीत प्रादेशिक व्यवस्थापक असल्याने त्याचे एमआयडीसी भागातील खासगी दंत महाविद्यालयात येणे-जाणे होते. जानेवारी २०१० मध्ये त्याची पीडित विद्यार्थिनीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली होती. पीडितेस विश्वासात घेऊन त्याने तिला २४ नोव्हेंबर २०११ रोजी कळमेश्वर मार्गावरील कुबेर रिसॉर्ट बार अ‍ॅण्ड गार्डन रेस्टॉरंटमध्ये नेले होते. शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिला विवस्त्र केले होते. त्यानंतर स्वत:च्या मोबाईलने तिची अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केली होती. पीडित विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन तिच्याचकडून तिचा फेसबुक अकाऊंट पासवर्डही त्याने प्राप्त केला होता. तिच्या फेसबुक अकाऊंटची मूळ सेटिंग बदलवून तिच्या प्रोफाईल वालमध्ये ही अश्लील व्हिडिओ क्लिप अपलोड केली होती आणि या व्हिडिओचे सार्वजनिक प्रसारण केले होते. हा प्रकार समजताच पीडित विद्यार्थिनीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून अजय गजभिये याच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)पीडित विद्यार्थिनीचे केले होते बनावट फेसबुक अकाऊंट आयडीपीडित विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ क्लिपबाबत समजताच तिने फेसबुक अधिकाऱ्याशी संपर्क साधून स्वत:चे अकाऊंट निष्क्रिय केले होते. त्यानंतर या आरोपीने पुन्हा तिचे बनावट फेसबुक अकाऊंट आयडी तयार करून पुन्हा अश्लील व्हिडिओ क्लिप अपलोड केले होते. काही दिवसानंतर त्याने अकाऊंटचे नाव बदलवले होते. तिचे अश्लील व्हिडिओ तिच्या सर्व मित्रांना , कुटुंबीयांना फ्रेन्डस् रिक्वेस्ट पाठवून दाखवले होते. आजही तो या व्हिडिओचे सार्वजनिक प्रसारण करीत आहेत. या शिवाय त्याने पीडितेच्या नातेवाईकांना अश्लील एसएमएस पाठवून मोठ्या प्रमाणावर बदनामी केली. अजयने पीडित विद्यार्थिनीला अविवाहित असल्याचे सांगून तिच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. पुढे तो सतत तिला लग्नाची गळ घालत होता. पीडितेने त्याच्याबाबत माहिती काढली असता तो विवाहित असून त्याला पलाश नावाचा मुलगाही असल्याचे तिला समजले होते. त्यानंतर तिने अजयला भेटणे टाळले होते. ती सतत आपणास भेटत राहावी आणि आपल्याशीच तिने लग्न करावे म्हणून आरोपीने हे अश्लील कृत्य केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एन. बी. गोरे, संपत चव्हाण, के. आर. जयस्वाल यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने ११ आणि बचाव पक्षाच्या वतीने ३ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत, आरोपीच्या वतीने अ‍ॅड. महेंद्र लिमये यांनी काम पाहिले. नायक पोलीस शिपाई किशोर ठाकरे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. अशी आहे शिक्षाआरोपी अजय गजभिये याला भादंविच्या ३२८ कलमांतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, ३५४ कलमांतर्गत सहा महिने कारावास, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-ए अंतर्गत एक वर्ष कारावास, तीन हजार रुपये दंड, ६६-सी अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड, ६६-डी अंतर्गत एक वर्ष कारावास, तीन हजार रुपये दंड, ६६-ई अंतर्गत एक वर्ष कारावास, ६७-ए अंतर्गत एक वर्ष कारावास आणि तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीला या सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील.