शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्यास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 01:15 IST

यशोदरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामातानगर येथील एका महिलेवर कुऱ्हाडीने वार करून जखमी करणाऱ्या

दंडाच्या रकमेतील तीन हजार जखमी महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशनागपूर : यशोदरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामातानगर येथील एका महिलेवर कुऱ्हाडीने वार करून जखमी करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील तीन हजार रुपये जखमी महिलेला नुकसानभरपाई म्हणून द्यावे, असा आदेशही न्यायालयाने दिला. शिवा अशोक सरोदे (२५), असे आरोपीचे नाव आहे. तर जानकीबाई धरमपाल शिवणे (४५), असे जखमी महिलेचे नाव होते. सरकार पक्षानुसार जखमी महिला आणि आरोपी एकाच मोहल्ल्यात राहतात. जानकीबाई ही १४ मार्च २०१५ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास समाजभवन नजीकच्या आपल्या घरासमोर मोहल्ल्यातील आणखी काही महिलांसोबत बसलेली होती. या महिला हसत होत्या आणि एकमेकींशी बोलत होत्या. त्याचवेळी आरोपी शिवा सरोदे हा तेथून जात असताना त्याला या महिला आपल्यालाच पाहून हसत असल्याचा समज झाला. त्याने या महिलांना शिवीगाळ करीत घर गाठून कुऱ्हाड आणली होती. त्याने जानकीबाईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला जखमी केले होते. या प्रकरणी जखमी महिलेच्या तक्रारीवरून यशोदरानगर पोलिसांनी भादंविच्या ३०७, ३२४, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बघेले यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. प्रत्यक्ष साक्षीपुराव्याच्या वेळी न्यायालयापुढे आलेल्या साक्षीनुसार आरोपीला भादंविच्या ३०७ आणि ५०४ या कलमांतर्गतच्या गुन्ह्यातून निर्दोष ठरवण्यात आले. भादंविच्या ३२४ कलमांतर्गतच्या गुन्ह्यात मात्र त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. विजय बनसोड यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल नामदेव पडोळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)